देशातील पहिले समलैगिक जज बनणार सौरभ कृपाल
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन व्ही रमण यांच्या अध्यक्षतेखाली कॉलेजीयाम अधिवक्ता सौरभ कृपाल यांना दिल्ली उच्च न्यायालायचे न्यायाधीश नेमण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली गेली आहे. कृपाल यांच्या नेमणुकीचा विषय गेली चार वर्षे विवादाचा बनला होता कारण कृपाल यांनी सार्वजनिक रित्या ते समलैगिक असल्याचे जाहीर केले होते आणि समलैगिकंच्या अडचणीच्या विरोधात सातत्याने आवाज उठविणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. कृपाल यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम २०१७ साली मांडला गेला होता.
त्यावेळी तत्कालीन कार्यवाहक मुख्य न्यायाधीश गीता मित्तल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली उच्च न्यायालयाच्या कोलेजीयम कडून पदोन्नती साठी कृपाल यांची शिफारस केली गेली होती. त्यानंतर या प्रस्तावाला मंजुरी देण्यास केंद्राने अडचण व्यक्त केली होती. या वर्षी मार्च मध्ये भारताचे तत्कालीन सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केंद्र सरकारला कृपाल यांना न्यायाधीश बनविण्याबाबत विचारणा करून मत देण्यास सांगितले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर कॉलेजीयमने ११ नोव्हेंबरच्या बैठकीत पुनर्विचार करून कृपाल यांच्या नेम्मुकीची शिफारस केल्याचे जाहीर केले आहे. कृपाल यांनी कायद्याची पदवी घेतल्यावर ऑक्सफर्ड येथे कायदा पदवी आणि केम्ब्रिज मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दीर्घकाळ वकिली केली आहे.