टी २० वर्ल्ड कप २०२४ साठी या देशाला संधी?

आयसीसी टी २० वर्ल्ड कप अंतिम सामन्यात एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. त्यानुसार २०२४ टी २० वर्ल्ड कप आयोजनाची संधी क्रिकेटशी फारशी सलगी नसलेल्या अमेरिकेला मिळू शकते असे संकेत दिले गेले आहेत. खरोखर हा वर्ल्ड कप अमेरिकेत खेळला गेला तर क्रिकेट इतिहासातील तो ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे. आय सीसी टी २० वर्ल्ड कप साठी युएसए क्रिकेट व वेस्ट इंडीज एकत्र बोली लावू शकतील असे संकेत मिळत आहेत.

सिडनी मॉर्निंग हेराल्ड रिपोर्ट नुसार क्रिकेट गव्हर्नर संयुक्त राज्य अमेरिकाची निवड देशातील पहिल्या टी २० वर्ल्ड कप आयोजनासाठी करू शकतात. यामुळे क्रिकेटचा २०२८ लॉस एंजेलिस ऑलिम्पिक मध्ये समावेश करणे सुलभ होणार आहे. म्हणजेच पुढचा टी २० वर्ल्ड कप अश्या ठिकाणी खेळला जाईल जेथे यापूर्वी कधीच त्याचे आयोजन झालेले नाही. अमेरिकेची क्रिकेटशी फारशी जवळीक नाही. मात्र या वर्ल्ड कप मुळे अमेरिकेत क्रिकेटचा  विस्तार होण्यास हातभार लागेल.

असे असले तरी बांगलादेश २०१४ टी २० वर्ल्ड कप नंतर भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आयोजित पहिल्या ग्लोबल टूर्नामेंट प्रमाणे हा प्रकार नसेल. त्या वर्षी तिन्ही देशांनी बदल केल्याने बीसीसीआय, इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्ड यांनी २०१५ ते २०२३ खेळाचे आयोजन, यजमानपद क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिले होते.