ही आहे जगातील सर्वात महागडी वेडिंग प्लॅनर


आजच्या काळात वेडिंग प्लॅनरचा व्यवसाय जोरात सुरू आहे. ज्या परिवाराकडे वेळ नसतो, असे परिवार लग्नाची सर्व तयारी करण्यासाठी वेडिंग प्लॅनरची नेमणूक करत असतात. शादी समारोहापासून ते जेवण, लायटिंग आणि डीजे अशी सर्व कामे वेडिंग प्लॅनर उत्तमरित्या करतो. अशी एक वेडिंग प्लॅनर साराह हेवुड ही आहे. तिला जगातील सर्वात महागडी वेंडिग प्लॅनर म्हणून ओळखले जाते.

सांगण्यात येते की, मोठमोठ्या सेलिब्रेटिजना देखील साराहचा खर्च झेपत नाही. तिने अनेक अब्जाधीश उद्योगपती आणि हॉलिवूड स्टार्सचा लग्नामध्ये वेडिंग प्लॅनर म्हणून काम पाहिले आहे. एवढेच नाही तर साराहने ब्रिटिश राजघराण्यातील प्रिंस विलियम त्यांची बहिण हॅरी आणि मेगन मार्केलच्या लग्नामध्ये देखील वेडिंग प्लॅनर म्हणून काम केले आहे.

साराह एका लग्नासाठी वेडिंग प्लॅनर म्हणून तब्बल 10 करोडो रूपये घेते. साराहने अशी अनेक लग्न लावली आहेत, ज्यांचे एक दिवसाचे बजेट हे 48 ते 50 करोड होते.

एका रिपोर्टनुसार, साराहची एकूण संपत्ती 165 करोड रुपये आहे. ती एक पॅरानॉर्मल वेडिंग शो देखील घेऊन येणार आहे. या शोसाठी ब्रिटनच्या युके टिव्हीने साराहशी करार केला आहे. हा जगातील पहिला पॅरानॉर्मल वेडिंग शो असेल.

डेस्टिनेशन वेडिंग असेल तर साराहच्या टीमसाठी 172 हॉटेल रूम बुक केले जातात. साराहची टीम पाच दिवस तेथे थांबून लग्न समारोहला शानदार बनवते.

कोणत्या लग्नावर किती खर्च करायचा आहे, कोठे करायचा आहे. याबाबत साराह आधीच सर्व तयारी करते. ती एकूण बजेटच्या 45 टक्के स्थळ, जेवण, ड्रिंक्स यावर खर्च करते. 15 टक्के रक्कम छोटे मोठे खर्च, 12 टक्के व्हिडीओ मेकिंगसाठी, 10 टक्के फोटोग्राफीवर, 8 टक्के फुलांवर आणि 5 टक्के ट्रांसपोर्टवर खर्च करते.

Leave a Comment