14000 फुटांवर बनले आहे जगातील पहिले अॅस्ट्रो व्हिलेज
लद्दाखमध्ये जगातील पहिले अॅस्ट्रो विलेज (खगोल गाव) बनवण्यात आले आहे. यामध्ये 4 हॉमस्टे असून, याचे कार्य 15 गावातील 30 महिला पाहतात. लद्दाख आपल्या उंचीमुळे आणि कोरड्या हवामानामुळे खगोलशास्त्रासाठी उत्तम ठिकाण आहे. येथे रात्री आकाशात तारे आणि ग्रह सहज ओळखता येतात. लद्दाख पुर्वीपासूनच पर्यटकांसाठी आवडीचे ठिकाण आहे. अॅस्ट्रो विलेजमुळे पर्यटकांची संख्या आणखी वाढेल. स्थानिक लोकांनी रात्रीचे आकाश एखादे संसधान आहे असे समजून, येथे रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि अॅस्ट्रो हॉमस्टे बनवले.
ग्लोबल हिमालयन एक्सपेडिशनने 2013 मध्ये गावातील स्थानिक लोकांना अॅस्ट्रो हॉमस्टे बनवण्याविषयी सांगितले. या संस्थेने इंटरनेशनल एस्ट्रोनॉमिकल यूनियन या संस्थेबरोबर मिळून प्रोजेक्टवर काम करण्यास सुरूवात केली. या प्रोजेक्टचे नाव अॅस्ट्रोनॉमी फॉर हिमालयन लिवलीहुड असे आहे.
संस्थेने सुरूवातीला अॅस्ट्रो विलेजमध्ये होमस्टे बनवले. त्यानंतर महिलांना ते चालवण्याची ट्रेनिंग दिली. आता या महिला टेलीस्कोप ऑपरेट करू शकतात. त्या महिला पर्यटकांसाठी राहण्याची सोय देखील करतात. हे अॅस्ट्रो व्हिलेज 14000 फुटांवर बनवण्यात आले आहे.
लद्दाखचा पहिला अॅस्ट्रो होमस्टे पँगोंग टीसोजवळ मान गावात आहे. मान गावातील 4 महिलांना यासाठी ट्रेनिंग देण्यात आली आहे. येथे 10 इंचचा ऑटोमेटिक ट्रँकिंग टेलिस्कोप आहे. मागील 2 महिन्यात 200 पेक्षा अधिक पर्यटक येथे आलेले आहेत. यामुळे त्यांना 50 हजार रूपयांचे उत्पन्न झाले. येथे दररोज 10 हजार पर्यटक नाइट स्काई वॉचिंगसाठी येतात.