…यामुळे असतात रेल्वेच्या बोगी वेगवेगळ्या रंगाच्या


भारतीय रेल्वे आशियातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. तर सरकारी मालकी असलेले जगातील चौथे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. दररोज हजारो लोक रेल्वेचा प्रवास करत असतात. तुम्ही देखील अनेकदा रेल्वेचा प्रवास केला असेल, मात्र तुम्ही कधी लक्ष दिले आहे का, रेल्वेच्या डब्बे वेगवेगळ्या रंगाचे का असतात आणि त्याचा अर्थ काय होतो ?

भारतीय रेल्वेविषयी रोचक माहिती म्हणजे, भारतीय रेल्वेच्या रूळांना एकारेषेत सरळ जोडले तर त्याची लांबी पृथ्वीच्या आकारापेक्षाही 1.5 पटीने जास्त आहे.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, देशातील सर्वात हळूवार चालणारी रेल्वे 10 किलोमीटर प्रती तासाच्या वेगाने चालते. या रेल्वेचे नाव मेट्टुपलायम ओट्टी नीलगीरी पॅसेंजर आहे. ही रेल्वे धोकादायक डोंगरांमधून जात असते.

तुम्ही बघितले असेल की, मोठ्या प्रमाणात रेल्वेचे डब्बे हे निळ्या रंगाचे असतात. या रंगाच्या डब्ब्यांचा अर्थ होतो की, हे आयसीएफ कोच आहेत. याचा वेग 70 ते 140 किलोमीटर प्रती तास असतो. असे डब्बे मेल एक्सप्रेस अथवा सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये लावले जातात.

आयसीएफ एसी असणाऱ्या रेल्वेमध्ये लाल रंगाच्या डब्ब्यांचा वापर केला जातो. राजधानी एक्सप्रेसमध्ये याचा वापर केला जातो.

हिरव्या रंगाच्या डब्ब्यांचा वापर हा गरीब रथ रेल्वेमध्ये केला जातो. तर तापकिरी रंगाच्या डब्ब्यांचा वापर मीटर गेज रेल्वेमध्ये होतो.  बिलिमोरा वाघाई पॅसेंजर एक नॅरो गेज रेल्वे आहे. यामध्ये हिरव्या रंगाच्या डब्ब्यांचा वापर केला जातो. यामध्ये तापकिरी रंगाच्या डब्ब्याचा देखील वापर करण्यात येतो.

काही रेल्वे झोनमध्ये स्वतःच्या रंगाचे नियम लागू केले आहेत. जसे की, मध्ये रेल्वेच्या काही रेल्वेंचा रंग पांढरा, लाल आणि निळ्या रंगाच्या योजनेचे पालन करतात.

Leave a Comment