हे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना नाचत-गात शिकवतात धडे


सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे ज्यामुळे एखादी सामान्य व्यक्ती काही क्षणातच इंटरनेट क्रश होतो. त्यातच सोशल मीडियामुळे अनेकजण स्टार झाल्याचे आपण पाहिलेच आहे. काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर डान्सिंग अंकल व्हायरल झाले होते. त्यानंतर सोशल मीडियामुळे राणू मंडल यांचे तर संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. सध्या सोशल मीडियावर त्यांच्याप्रमाणेच आणखी एक व्यक्ती व्हायरल होत आहे.

सोशल मीडियात सध्या व्हायरल होणारा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. ओदिशामधील एका शाळेच्या मुख्याध्यापकांचा हा व्हिडीओ असून प्रफुल्ल कुमार पाथी असे त्यांचे नाव आहे. ओदिशातील एका सरकारी शाळेमध्ये ते मुख्याध्यापक म्हणून काम करतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या मुख्याध्यापकांनी व्हायरल होण्यासाठी काय केले आहे? तर आम्ही तुम्हाला सांगतो की प्रफ्फुल कुमार आपल्या शिकवण्याच्या हटके स्टाइलमुळे सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

नेहमीच्या शिकवण्याच्या पद्धतीऐवजी प्रफुल्ल कुमार हटके पद्धतीने मुलांना शिकवतात. त्यांच्या याच शैलीमुळे ते 25 ऑगस्टपासून इंटरनेट स्टार बनले आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, ते त्यांच्या शाळेतील मुलांना गाण्यांमधून तसेच डान्स करत शिकवत आहेत. शाळेत जो विषय शिकवायचा आहे, त्याची तयारी प्रफुल्ल कुमार घरातूनच करून येतात.

सोशल मीडियावर शेअर करण्यात येणाऱ्या या व्हिडीओमध्ये प्रफुल्ल कुमार क्लासरूममध्ये गाणे म्हणत शिकवताना दिसत आहेत. तसेच त्याच उत्साहात विद्यार्थीही त्यांच्यासोबत ठेका धरताना दिसत आहेत. कोरापुट जिल्ह्यातीव लमतापुट अपर प्रायमरी शाळेमध्ये 56 वर्षांचे प्रफुल्ल कुमार शिकवत आहेत. त्यांना त्यांच्या याच वेगळ्या अंदाजामुळे सर्वजण ‘डान्सिंग सर’ म्हणून ओळखले जातात. डान्सिंग सर यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, मला हे जाणवले आहे की, जर मुलांना वेगळ्या पद्धतीने शिकवले तर मुले आवडीने शिकतात. त्यांना कंटाळा येत नसल्यामुळेच मी शिकवण्याची वेगळी पद्धत आत्मसात केली. गाणे आणि डान्स करत जेव्हा मी शिकवण्यास सुरुवात केली तेव्हापासून मुले आणखी उत्साहात आणि मनापासून अभ्यास करू लागली.

शाळेत प्रफुल्ल कुमार म्हणजेच डान्सिग सर येण्याआधी सर्व विषय गाण्यामध्ये बसवतात आणि त्याचा सरावही करतात. मीडिया रिपोर्टनुसार, असे दिसून आले आहे की, शाळेतील अनेक मुले प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याआधीच शाळा सोडतात. पण त्याच्या या आगळ्या-वेगळ्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे शाळेत येणाऱ्या मुलांच्या संख्येत वाढ झाली आहे.

Leave a Comment