9,000 फुट ऊंचीवर बनवण्यात आले स्काय साइक्लिंग पार्क


हिमाचल प्रदेशमधील मनाली येथे एडवेंचर्स स्पोर्टससाठी स्काई सायकलिंग पार्क बनवण्यात आले आहे. पुढील 15 दिवसात हे पार्क पर्यटकांसाठी उघडले जाणार आहे. हे पार्क समुद्र सपाटीपासून तब्बल 9000 फूट उंचावर आहे. हे पार्क वन विभाग आणि अटल बिहारी वाजपेयी इंस्टीट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगने बनवले आहे.

मनालीचे वन अधिकारी नीरज चड्ढा म्हणाले की, पर्यटक येथे 350 मीटर लांब पार्कमध्ये बनलेल्या ट्रॅकवर सायकलिंग करू शकतात. मनाली पहिल्यापासूनच पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. दरवर्षी हजारो पर्यटक येथे येत असतात.

बर्फाच्छादित पर्वतांवर बाइक रायडिंग, स्नो फालिंग सारख्या गोष्टी येथे आकर्षणाचे केंद्र आहे. पर्यटकांसाठी स्काई पार्क उघडल्यानंतर पर्यटकांच्या संख्येत अधिक वाढ होईल. हे पार्क मनालीपासून 24 किलोमीटर अंतरावर आहे.

 

Leave a Comment