सेल्फी पोस्ट करणारे असतात अयशस्वी, अभ्यासकांचा दावा


वॉशिंग्टन स्टेट युनिवर्सिटीच्या अभ्यासात दावा करण्यात आला आहे की, दुसऱ्यांनी काढलेले फोटो अपलोड करणारे लोक अधिक आत्मविश्वासी असतात. तर सोशल मीडियावर वारंवार सेल्फी अपलोड करणारे लोक नवीन गोष्टी आणि नवीन अनुभवांना

सामारे जाण्यासाठी तयार नसतात. मुख्य संशोधक क्रिस बैरीने सांगितले की, अभ्यासात समोर आले की सहभागी झालेल्या लोकांना सामान्य फोटो पोस्ट करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत सेल्फी पोस्ट करणारे अधिक असुरक्षित, अयशस्वी आणि नकारात्मक वाटले.

या अभ्यासात कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सहभागी करण्यात आले होते व त्यांचे दोन गटात विभाजन करण्यात आले होते. पहिल्या गटात अंडर ग्रेज्युएट विद्यार्थी होते. त्यांना प्रश्नावली देण्यात आली होती व त्यांच्या 30 इंस्टाग्राम फोटोचे विश्लेषण करायचे होते. दुसऱ्या गटात 119 विद्यार्थी होते.  त्यांना पहिल्या गटातील विद्यार्थ्यांच्या इंस्टाग्राम फोटोंवर आत्मविश्वास, यश आणि स्वभाव या गोष्टींवर रेटिंग द्यायचे होते.

अभ्यासात समोर आले की, दुसऱ्यांद्वारे काढण्यात आलेले फोटो अपलोड करणारे लोक अधिक आत्मविश्वासू, मोकळ्या स्वभावाचे, यशस्वी आणि विश्वासू दिसले. तर सेल्फी काढणारे नकारात्मक दिसले. बैरी सांगतात की, आमच्या अभ्यासाचा सुरूवातीचा उद्देष लोकांचे सेल्फी घेणे आणि त्यांच्या घमंडी स्वभावामधील संबंध शोधणे हे होते. मात्र या निर्णयाने अभ्यासाची दिशाच बदलली.

अभ्यासात समोर आले की, सोशल मीडिया प्रोफाइलद्वारे लोक भलेही आनंदी असले, तरी दुसऱ्या लोकांचे मत वेगळे असते. दुसऱ्या गटातील अधिक वयाच्या व्यक्तींना, दुसऱ्या वयोगटातील सेल्फी काढणारे नकारात्मक वाटले.

Leave a Comment