हा प्राणी पाळा आणि हृदयविकार टाळा


आतापर्यंत तुम्ही ऐकले असेल की, कुत्रा मनुष्याचा सर्वात चांगला मित्र असतो. असा मित्र जो नेहमी आपल्या सोबत असतो. मात्र आता वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, तुमचा हा मित्र तुमच्या आरोग्याची देखील काळजी घेतो. जर तुमच्या घरात कुत्रे असेल तर तुमच्या ह्रदयासाठी चांगले आहे. कारण कुत्रे असल्याने तुम्हाला बाहेर चालण्याची, पळण्याची, फिरण्याची संधी मिळत असते. तुमचे जेवढे शारिरिकरित्या सक्रिय असाल, तेवढे तुमच्या ह्रदयासाठी चांगले आहे.

वैज्ञानिकांनी कुत्रे पाळणाऱ्या लोकांवर अभ्यास केला. त्यांनी बघितले की, ज्या घरात कुत्रा असतो ते शारिरिक रित्या अधिक सक्रिय असतात. अशा लोकांचे डाइट देखील इतरांपेक्षा चांगले असते आणि या लोकांमध्ये डायबेटिजचा आजार देखील खूप कमी प्रमाणात दिसते.

जेव्हा तुम्ही कुत्रे पाळता, तेव्हा कुत्र्याबरोबरच तुम्हीही शारिरिकरित्या सक्रिय असता. सकाळ-संध्याकाळ तुम्ही कुत्र्याला फिरायला घेऊन जाता. हे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तुमचे डाइट जेवढे चांगले असेल तेवढे तुम्हाला कार्डियोवेस्कुलर आजार कमी होतील. जर तुम्ही तंदरुस्त असाल तर तुम्हाला डायबेटिज देखील होणार नाही. डायबेटिज हे हार्ट अटॅकचे प्रमुख कारण आहे.

हे संशोधन सेंट एनी युनिवर्सिटीच्या ब्रेनो हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. यामध्ये दोन हजार पेक्षा जास्त लोकांवर परिक्षण करण्यात आले. यामध्ये 24 ते 65 वयोगटातील व्यक्ती होते व त्यांची हार्ट अटॅकची कोणतीही हिस्ट्री नव्हती. डॉक्टर एंड्रू मोग्रेरी यांचे म्हणणे आहे की, जे लोक प्राणी पाळतात, त्यांचे आरोग्य अधिक चांगले असते. त्यामुळे जर तुम्ही अद्याप कुत्रे पाळले नसेल तर नक्की पाळा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment