या ठिकाणी सापडले तब्बल 38 लाख वर्ष जुने मानवी अवशेष


इथोपिया येथे पुरातत्वशास्त्रज्ञांना 38 लाख वर्ष जुन्या एका कवटीचे अवशेष सापडले आहेत. हे अवशेष मनुष्याच्या विकासाबद्दल सांगण्यास मदत करतील. वैज्ञानिकांनुसार, हे एका छोट्या लुसी (प्राचीन मुनष्याची प्रजाती) चे अवशेष आहेत. पुरातत्वशास्त्रज्ञानी या कवटीला एमआरडी हे नाव दिले आहे.

क्वीललँड म्युझियम ऑफ नेच्युरल हिस्ट्रीचे पुरातत्वशास्त्रज्ञ योहानेस हैले सेलासी यांचे म्हणणे आहे की, ही कवटी जवळपास 3 लाख वर्ष जुन्या होमीनिडचे जीवाश्म आहेत.

पुरातत्वशास्त्रज्ञानी 2011 मध्ये चाड येथे टुमई चे जवळपास 7 लाख वर्ष जुने अवशेष शोधले होते. त्यांना मानव वंशाचे पहिले प्रतिनिधी म्हणून ओळखले जाते. अर्डी ( होमीनिडची एक प्रजाती) 1994 मध्ये इथोपियामध्ये सापडली होती. सांगण्यात येते की, ती कवटी 45 लाख वर्ष जुनी होती. 1974 मध्येच इथोपिया येथे लूसीचे अवशेष सापडले होते. ते तब्बल 32 लाख वर्ष जुने होते. लूसीला ऑस्ट्रेलोपिथेकस एफरेंसिस देखील म्हटले जाते. सर्वाधिक काळ जगणारी ही सुरूवातीची मानव प्रजाती होती.

इथोपिया येथे सापडलेली कवटी ही ऑस्ट्रेलोपेथेकस एनामेंसिस प्रजातीशी संबंधीत आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांना जे अवशेष सापडले आहेत ते तब्बल 38 लाख वर्ष जुने आहेत. संशोधकांचे म्हणणे आहे की, हे अवशेषांमुळे लाखो वर्षांपुर्वी लुप्त झालेली होमिनिड्स प्रजातीबद्दल महत्त्वाची माहिती मिळू शकते.

Leave a Comment