अंकशास्त्र सांगते हा व्यवसाय आहे तुमच्यासाठी योग्य


व्यवसायामध्ये सर्वांनाच यशस्वी व्हायचे असते. अनेक जण मेहनत करून देखील व्यवसायामध्ये यश न मिळाल्यास निराश होत असतात. मात्र आपल्या जीवनातील प्रत्येक घटनेवर आणि यशामागे ग्रह-ताऱ्यांचा मोठा प्रभाव असतो.

अंकशास्राच्या मदतीने ज्याप्रमाणे भविष्य जाणून घेण्यास मदत होत असते. त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी देखील अंकशास्त्राचा फायदा होत असतो. ज्योतिषाचार्य सुजीत जी महाराज यांच्यानुसार, जन्म तारखेचा संबंध हा भाग्य आणि व्यवसायाशी असतो. 1 ते 9 पर्यंतच्या जन्म तारखेच्या अंकाचे वेगवेगळे महत्त्व आहे. जाणून घेऊया कोणत्या अंकाचा कोणत्या व्यवसायासाठी फायदा होतो.

कोणत्या तारखेसाठी कोणता व्यवसाय योग्य ? – 
जन्म तारीख 1 – शिक्षणाच्या क्षेत्रात हे लोक अधिक चांगले कार्य करू शकतात. वकीली किंवा सॉफ्टवेअर व्यवसाय देखील ते उत्तम प्रकारे चालवू शकतात. राजकारणात देखील त्यांना फायदा होऊ शकतो.
जन्म तारीख 2 – चित्रपट निर्मिती, डेअरी, मेडिसिन, इलेक्ट्रिक सामानांचा व्यवसाय चांगला आहे.
जन्म तारीख 3 – शिक्षण, कोचिंग किंवा मेडिकल व्यवसाय चांगला पर्याय आहे. एनजीओचे कार्य देखील त्यांच्यासाठी चांगले आहे.
जन्म तारीख 4 – इलेक्ट्रिकल अथवा इलेक्ट्रॉनिक व्यवसाय, कॉन्ट्रॅक व्यवसाय, लोखंडा संबंधित व्यवसाय हे लोक अधिक चांगल्या पध्दतीने करू शकतात.
जन्म तारीख 6 – कॉम्प्यूटरचा व्यवसाय, मेडिसिन, डेअरीचा व्यवसाय यांच्यासाठी चांगला आहे.
जन्म तारीख 7 – चित्रपट अथवा प्रोडक्शन हाउस, इंडस्ट्री अथवा वकिलीचा व्यवसाय यांच्यासाठी उत्तम आहे.
जन्म तारीख 8 – लोखंडासंबंधीत व्यवसाय, वकिली, मेडिसिन तसेच शिक्षण व्यवसाय योग्य आहे.
जन्म तारीख 9 – जमीन, रिअल इस्टेट,कंस्ट्रक्शन व्यवसाय चांगला आहे.

कोणत्या जन्म तारखेच्या व्यक्तींनी सोबत व्यवसाय केला पाहिजे ? –
जन्म तारीख 1 असणाऱ्यांनी जन्म तारीख 8 असणाऱ्यांबरोबर व्यवसाय करू नये.  अंक 02 ने 04 बरोबर आणि 09 ने 06 बरोबर काम करू नये. जन्म तारीख 01 आणि 3 ची भागीदारी चांगली होते. तसेच अंक 02 आणि 03 देखील चांगले आहे. जन्म तारीख 9 अंक 01 आणि 03 बरोबर चांगला व्यवसाय करू शकतो. जन्म तारीख 09 आणि 02 च्या व्यक्तींची चांगली भागिदारी होऊ शकते.

Leave a Comment