मेक्सिकोमधील एक ठिकाण ‘झोन ऑफ सायलेंस’ नावाने प्रसिध्द आहे. हे ठिकाण वेगळ्याच कारणासाठी प्रसिध्द आहे. येथे होणाऱ्या विचित्र घटनांबद्दल वाचून तुमच्या लक्षात येईल की, या जागेचे नाव ‘झोन ऑफ सायलेंस’ का आहे.
या जागेची सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे, येथे येताच जगभरातील सर्व इलेक्ट्रिक उपकरणे काम करणे बंद करते. सांगण्यात येते की, या जागेत असे काहीतरी आहे की ज्यामुळे येथे रेडिओ फ्रिक्वेंसी काम करत नाही.
ही जागा मेक्सिको येथील चिहुआहुआ वाळवंट या नावाने ओळखली जाते. आजपर्यंत हे एक कोडेच आहे की, येथे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बंद का पडतात ?
येथे उल्कापिंड पडल्यानंतर ही जागा चर्चेत आली आहे. याजागेवर पहिल्यांदा 1938 मध्ये उल्कापिंड पडले होते. यानंतर 1954 मध्ये दुसरे उल्कापिंड पडले. त्यानंतर अनेक जण या जागेबद्दल विचित्र दावे करू लागले.
सांगण्यात येते की, येथून जाणाऱ्या एका अमेरिकन टेस्ट रॉकेटचा अपघात झाला. त्यानंतर या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक उपकरणे का चालत नाहीत, याचा शोध घेण्यास सुरूवात झाली. वैज्ञानिक येथे पोहचल्यावर त्यांना आढळून आले की, या ठिकाणी दिशा ह्या कम्पास आणि जीपीएसप्रमाणे फिरत आहे.
तेलाच्या शोधात आलेल्या एका कंपनीने 1966 मध्ये या जागेला ‘झोन ऑफ सायलेंस’ असे नाव दिले. कंपनीच्या लोकांनी येथे 50 किमी पर्यंत पसरलेल्या जागेचा अभ्यास सुरू केला तेव्हा त्यांचे सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बंद पडले.