पर्यावरण संवर्धनासाठी पछाडलेल्या एका व्यक्तिची गोष्ट


एकीकडे संपुर्ण जग ग्लोबल वॉर्मिंग आणि पर्यावरणाच्या समस्येला सामोरे जात आहेत. शहरीकरणामुळे जंगल नष्ट होत चालले आहेत. मात्र आजही अशीही काही माणसे आहेत, जी समाजासाठी काहीतरी करण्याच्या इच्छेने पछाडलेली असतात. अशीच एक व्यक्ती मणिपूरमध्ये राहणारे मोइरंग लोइया हे आहेत. मोइरंग लोइया यांनी स्वतः एक संपुर्ण जंगलच तयार केले आहे.

गेल्या 17 वर्षांपासून लोइया यांनी 300 एकरमध्ये जंगल तयार केले आहेत. यामध्ये 250 प्रजातींची वेगवेगळी झाडं, बांबूच्या 25 प्रजाती आणि अनेक पक्षी आणि प्राणी देखील या जंगलात आहेत.

वर्ष 2000 मध्ये लोइया जेव्हा कॉलेज संपवून कोबरू पिक येथे परतले तेव्हा त्यांना त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. एकेकाळी संपुर्ण हिरवळ असलेल्या या जागेवर काहीच नव्हते. त्यावेळी त्यांनी झाडे लावण्यासाठी जागा शोधण्यास सुरूवात केली.

अखेर मारू लंगोल हिलवर त्यांनी झाडे लावण्याचा निर्णय घेतला. मेडिकल रिप्रेजेंटिटिव्हची नोकरी सोडत त्यांनी 6 वर्ष त्याठिकाणी वेगवेगळी झाडे लावले. राज्य सरकारने देखील त्यांना या कामात मदत केली.आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी देखील या कार्याचे स्वागत केले. लोइया हे फार्मासिस्ट म्हणून काम करतात व ऑरगेनिक शेतीही करतात.

लोइया सांगतात की, मी स्वतःला पेंटर समजतो. बाकी पेंटर कॅनवस, ब्रश आणि रंगाचा वापर करतात. मात्र मी या पर्वतांनाच कॅनवस म्हणून निवडले आणि यावर झाडे लावत कलाकृती तयार केली. हे बनवण्यात माझे संपुर्ण आयुष्य गेले.

Leave a Comment