जुन्या प्रेमासाठी प्रेयसीचे कायपण


लोक प्रेमात वेडी होतात हे तर आपण नेहमीच ऐकत असतो. प्रेमासाठी कोणत्याही थराला जाण्याची अनेकांची तयारीही असते. असेच प्रकरण ऑस्ट्रेलियामध्ये घडले आहे. ऑस्ट्रेलियातील एका महिलेने आपल्या एक्स बॉयफ्रेंडला  भेटण्यासाठी विचित्र कारनामा केला आहे. तिच्या या कारनाम्यामुळे शहरातील लोक देखील हैराण झाले आहेत. महिला एक्स बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी शहरातील प्रत्येक भिंतीवर मेसेज लिहित आहे आणि त्याला भेटण्याचे आवाहन करत आहे.

महिलेने ऑस्ट्रेलियातील फ्रेकटाउन येथील पार्क, पब्लिक बाथरूम, बारबिक्यू आणि प्रत्येक भितींवर लिहिले आहे की, क्रिस, बाळ या जगात येण्याआधी तू माझ्याशी बोलणे गरजेचे आहे. त्यानंतर काळजी करण्याचे काहीही कारण नाही. महिलेने लिहिलेला हा मेसेज लोकांनी फोटो काढत सोशल मीडियावर शेअर केले.

या मेसेजनंतर देखील क्रिसने अद्याप महिलेशी संपर्क केलेला नाही मात्र पोलिसांनी त्या महिलेला अटक केली आहे. 36 वर्षीय महिलेवर सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करण्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या ती जामीनावर बाहेर आहे.

स्थानिक लोकांना आशा होती की, मेसेज सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर क्रिस आपल्या एक्स गर्लफ्रेंडला भेटायला येईल. मेसेज शेअर करणाऱ्यांना महिलेची ही कल्पना भलतीच आवडली. मेसेज शेअर करणाऱ्या पीटर बरोजने सांगितले की, माझ्या मते ही चांगली कल्पना आहे. मात्र अनेकांना प्रत्येक ठिकाणी असलेले असे मेसेज आवडलेले नाहीत.

या घटनेनंतर क्रिस नक्की कोण आहे व तो का भेटत नाहीये हे जाणून घेण्यास लोक उत्सुक झाले आहेत. असे वाटते की, क्रिसने या महिलेशी ब्रेकअप केले आहे आणि महिला क्रिसच्या बाळाची आई आहे, त्यामुळे असे वागत आहे.

Leave a Comment