दररोज करा व्यायाम मिळवा लाखो रुपये कमवणाऱ्या व्यक्ती एवढा आनंद


येल आणि ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीच्या संशोधकांनी 12 लाख लोकांवर केलेल्या सर्वेक्षणामध्ये दावा केला आहे की, दररोज व्यायाम केल्याने पैसे कमवण्यापेक्षा अधिक जास्त आनंद मिळतो. हा आनंद जवळपास 17 लाख रूपये कमवण्या एवढा असतो. संशोधनामध्ये समोर आले की, फिजिकली एक्टिव लोकांना स्वतः बद्दल तेवढेच चांगले वाढते, जेवढे एका वर्षात 17 लाख रूपये कमावणाऱ्या व्यक्तीला वाटते.

संशोधकांनी त्यांच्या वयाबद्दल विचारत 75 फिजिकल एक्टिविटीज पैकी त्यांची आवडती एक्टिविटी निवडण्यास सांगितले. यामध्ये सफाईपासून, लहान मुलांची काळजी घेणे, सायकलिंग, वेट लिफ्टिंग आणि धावणे याचा समावेश होता. तसेच, 30 दिवसात किती वेळा थकल्याप्रमाणे वाटले असे प्रश्न देखील विचारण्यात आले.

संशोधकांना दिसले की, दररोज व्यायाम करणाऱ्या लोकांनी स्वतःला एका वर्षात जवळपास 35 दिवस थकल्यासारखे वाटते. तर व्यायाम न करणाऱ्या लोकांना 58 दिवस थकल्यासारखे वाटते. येल युनिवर्सिटीचे एडम चेकराउंड सांगतात की, जास्त व्यायाम केल्याने आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो. एका मर्यादित वेळेत व्यायाम करणे गरजेचे आहे.

संशोधनामध्ये समोर आले की, तीन तासांपेक्षा अधिकवेळ व्यायाम करणाऱ्याचा मूड कमी एक्टिव असणाऱ्यांपेक्षा खराब असतो. एरोबिक्स, सायकलिंग आणि जिम एक्टिविटीज करणे लोकांना आवडते. त्यामुळे लोकांना आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आवडता व्यायाम करणे गरजेचे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment