आनंद कुमारांचा हा शिष्य गरीब विद्यार्थ्यांसाठी बनला आहे ‘हेल्पिंग हँड’

अनेक खडतर प्रवास करून यश मिळाल्यानंतर, समाजासाठी काम करण्याची इच्छा खूप कमी लोकांमध्ये असते. उत्तर प्रदेशच्या ब्रिजेशचा असाच प्रेरणादायी प्रवास आहे. बृजेश सरोज आज अनेक लहान मुलांसाठी आशेचे केंद्र आहे. आयआयटी केल्यानंतर बृजेशने समदर्शी फाउंडेशनची सुरूवात केली आहे. हे फाउंडेशन गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करते. एवढेच नाही तर अनेक गावात मुलभूत सुविधा देखील पुरवत आहे.

उत्तर प्रदेशच्या प्रतापगढचा असलेला बृजेशचे वडिल हे सुरतमध्ये विणकाम करत असे. आर्थिक परिस्थितीमुळे त्याला लहानपणापासूनच काम करावे लागले. कधी हॉटेलमध्ये, कधी टेंटमध्ये अशी अनेक कामे त्यानी केली. 10 वी मध्ये त्याला 92 टक्के होते तर 12 मध्ये 95 टक्के होते. पैसे जमवून अखेर त्याने आनंद कुमार यांच्या सुपर 30 मध्ये प्रवेश मिळवला. तेथे एक वर्षांची तयारी केल्यानंतर अखेर आयआयटी मुंबईमध्ये सिलेक्शन झाले. संघर्ष एवढ्यावरच संपलेला नव्हता. खरा संघर्ष तर आता सुरू झाला होता.

बृजेशला अॅडमिशनसाठी पैसे गोळा करायचे होते. बृजेशाची ही माहिती समजताच अनेक नेते पुढे आले. उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी देखील त्याची मदत केली. अखेर अॅडमिशन झाल्यावर त्याने निश्चय केला की, त्याच्याबरोबर जे झाले, त्याला ज्या अडचणीतून सामोरे जावे लागले. ते इतरांबरोबर होऊ नये. अमिर खानने देखील त्याला बोलवून त्याची सहायत्ता केली.

बृजेशने सुरू केलेल्या समदर्शी संस्थेचा अर्थ आहे सर्व समान. त्याच्या संस्थेत प्रत्येक जाती धर्माची मुल शिकायला येतात. तेथे शिकून त्यांचे अॅडमिशन सरकारी शाळेत होते. त्यांची संस्था केवळ लहान मुलांना शिकवत नाही तर त्यांनी कसारा येथील तीन गावांना दत्तक देखील घेतले आहे. ते गावात मुलभूत सुविधा उपलब्ध करून देतात.

ज्या गावांना त्यांनी दत्तक घेतले आहे ती गावं डोंगरांवर आहेत. बृजेशने तेथे पम्पिंगची सुविधा सुरू केली. गावात अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. आयआयटीमध्ये अडमिशन झाल्यानंतर तो थांबला नाही. समाजासाठी काहीतरी करण्याच्या हेतूने त्याने कार्य सुरूच ठेवले. स्वतःबरोबरच तो लहान मुलांची स्वप्न देखील पुर्ण करत आहे.

Leave a Comment