का वाढतेय लग्नाचे वय?

vivah
आजकाल तरूण तरूणींच्या लग्नाचे वय वाढत असल्याचे दिसून येत आहे. कांही वर्षांपूर्वी मुलीचे लग्नाचे वय २१ ते २३ दरम्यान तर मुलांचे वय २६ ते २९ दरम्यान होते ते आता अनुक्रमे २६ ते ३० व मुलांसाठी ३० ते ३६ पर्यंत वाढलेले दिसते आहे. या मागची कारणेही विचार करण्यासारखी आहेत. कोणती आहेत ही कारणे?

या तरूण पिढीच्या विशलिस्टमध्ये लग्न आहे हे नक्की. मात्र कांही गोष्टींची पूर्तता होईपर्यंत थांबण्याची या पिढीची तयारी आहे. लग्नावर या पिढीचा विश्वास आहे त्यामुळेच आपल्या बरोबरीच्या मित्रमैत्रिणींची लग्ने ठरल्याचे पाहून ते थोडेफार दुःखीही होतात मात्र म्हणून तातडीने लग्न करण्याचा निर्णय मात्र घेत नाहीत हे विशेष.

ड्रीम वेडींग- आजकालच्या मुलामुलींसाठी लग्न हे ड्रीम आहे. त्यात मुलींना लग्नाचे स्थळ, हनीमून, लग्नाचे कपडे व पुढचे आयुष्य सुखी समाधानी असेल याची शाश्वती हवी असल्याचे दिसते तर मुलांना लग्नानंतर येणार्‍या जबाबदार्‍यांची पूर्ण जाणीव आहे व त्यामुळे स्थिर करियर, सेव्हींग तगडे असावे अशी अपेक्षा आहे. पूर्वीच्या तुलनेत आज करियरसाठीची स्पर्धाही तीव्र आहे त्यामुळे चांगली जीवनशैली जगताना घर, गाडी असणेही आवश्यक वाटते आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी थोडा अवधी हवा म्हणून लग्नाचे वय वाढत चालले आहे.

शिक्षण व करियर-आजकाल मुलींही शिक्षण व करियर हा जीवनातले अविभाज्य अंग असल्याचे मानत आहेत. पूर्वी पदवीनंतर मुलीच्या लग्नाची तयारी सुरू केली जात असे आज मात्र पदव्युत्तर शिक्षण, नोकरी याला मुली महत्त्व देत आहेत. मुलांनाही नोकरीवाली व करियरवाली मुलगी हवी आहे त्यामुळे मुलींचेही लग्नाचे वय पुढे गेले आहे.

vivah1
समजून घेण्यासाठी वेळ- लव्ह मॅरेज असो अथवा अॅरेंज मॅरेज असो, मुलगा व मुलगी दोघांनाही या बंधनात पडण्यापूर्वी एकमेकांना समजून घेण्याची आवश्यकता वाटते आहे. त्यामुळे पूर्ण ओळख झाल्यावर अथवा साखरपुडा झाल्यानंतरही सात आठ महिन्यांनंतरच लग्नाचा विचार केला जात असल्याचे दिसून येत आहे. आवडनिवड जुळली, विचार जुळले तरच लग्नाचे पाऊल टाकले जात आहे.

लिव्ह इन रिलेशनशीपला भारतात कायद्याने मान्यता दिली गेली आहे. राईट टू लाईफ या कायद्याअंतर्गत ही मान्यता दिली गेली आहे. त्यामुळे अनेकजण या पर्यायाचाही विचार करताना दिसत आहेत.दीर्घकाळ पतीपत्नीसारखे राहणार्‍या जोडप्यांचे कालांतराने पटले नाही तर महिलांना पोटगीचा अकार दिला गेला आहे. याचाही विचार केला जात आहे.

परफेक्ट मॅच- दोन दशकांपूर्वी उपवर मुलीला स्वयंपाक करता आला, घरकाम करता आले की पुरेसे होत असे तसेच मुलाला चांगला पगार व घरदार असले की मुलींच्याही फारशा अपेक्षा नसत. आता गरजा वाढल्याने मुलांना शिकलेली, मिळवती मुलगी हवी असते तर मुलीही घरकामात मदत करणारा, विचार जुळणारा मुलगा हवा यासाठी कांही काळ वाट पाहण्यास तयार आहेत. या व अशा अनेक कारणांनी लग्नाचे वय मात्र पुढे गेले आहे.

Leave a Comment