महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्हाला त्यांना संपवावे लागेल ; नितेश राणेंचे खळबळजनक वक्तव्य!


मुंबई – महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. अमरावती, नांदेड, औरंगाबादमध्ये हिंसक घटना घडल्याचे दिसून येत आहेत. अमरावतीमध्ये तर जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. दरम्यान आता राज्यातील राजकारण या हिंसक घटनांवरून तापले आहे. आरोप-प्रत्यारोप सत्ताधारी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये सुरू आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.


रझा अकादमी ही दहशतवादी संघटना महाराष्ट्रातील काही भागात घडलेल्या अनेक हिंसक घटना आणि दंगलींमागे आहे. ते प्रत्येक वेळी शांतता भंग करतात, सर्व नियम पायदळी तुडवतात आणि आपले सरकार बसून राहते, बघत बसते. एकतर सरकारने यांच्यावर बंदी आणावी, अन्यथा महाराष्ट्राच्या आम्ही भल्यासाठी त्यांना संपवू, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.


तसेच, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी माझ्यावर कारवाईची भाषा करण्यापेक्षा दंगल भडकवणाऱ्या रझा अकादमीच्या मुख्य सुत्रधारांना कधी अटक करत आहात ते सांगावे. नाहीतर येणाऱ्या दिवसांत रझा अकादमीच्या मुंबई कार्यालयावर आम्ही मोर्चा काढणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले आहे.


त्याचबरोबर, मराठा समाजाचे ५८ मोर्चे निघाले. कालच्या पेक्षा मोठे पण कोणालाही त्रास झाला नाही. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लागतात, औरंगजेबचे नाही.! असे देखील वक्तव्य ट्विटद्वारे नितेश राणे यांनी केले आहे.