मणिपूरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला ; कर्नलसह सहा जणांचा मृत्यू


मणिपूर – मोठा दहशतवादी हल्ला मणिपूरमध्ये लष्कराच्या एका ताफ्यावर झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय लष्करातील कर्नल, त्यांची पत्नी व मुलाचा या हल्ल्यात मृत्यू झाला असून, अन्य तीन जवान देखील शहीद झाले आहेत. या क्षेत्रात मागील अनेक वर्षांमधील झालेला हा मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार सकाळी जवळपास १० वाजता मणिपूरच्या चुराचांदपूर जिल्ह्यातील म्यानमार सीमेजवळ ही घटना घडली. दहशतवाद्यांनी आसाम रायफल्सच्या एका ताफ्यावर हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.