‘या’ विशेष भागाचा १३ कोटी भरून मॉडेलने उतरवला विमा!


आपल्यापैकी अनेकजण भविष्याची चिंता म्हणून आपल्या आयुष्याचा, घराचा किंवा वाहनाचा विमा उतरवतात. पण १३ कोटी देऊन ब्राझिलियन मॉडेलने भलत्याच गोष्टीचा विमा उतरवला आहे. तिने आपल्या बटचा अर्थात पार्श्वभागाचा विमा उतरवला आहे. या मॉडेलने एका स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर तिच्या शरीराच्या एका भागाचा विमा उतवण्याचा निर्णय घेतला.

नाथी किहारा असे या ३५ वर्षीय मॉडेलचे नाव असल्याचे वृत्त आहे. नुकतेच किहाराने मिस बट वर्ल्ड २०२१ चे विजेतेपद पटकावले. इंस्टाग्रामवरील सर्व स्पर्धकांपैकी सर्वाधिक मते मिळविल्यानंतर किहाराला मिस बट वर्ल्ड म्हणून घोषित करण्यात आले.


३५ वर्षीय किहाराने हे विजेतेपद जिंकल्यानंतर आता आपल्या पार्श्वभागाचा विमा उतरवण्याचा निर्णय घेतला. तिने यासाठी १.३ मिलियन पौंड अर्थात भारतीय रुपयांचे १२ कोटी ९५ लाख रुपये खर्च केले आहेत. म्हणजेच, किहाराने जवळपास १३ कोटी रुपये देऊन तिच्या एका अवयवाचा विमा उतरवला आहे. याबाबत किहारा म्हणते, माझ्या पार्श्वभागामुळे मी प्रसिद्ध आहे. तसेच मी विजेतेपदही जिंकले आहे. त्यामुळे विमा उतरवला आहे. किहाराचा दावा आहे की ती अजूनही तिच्या पार्श्वभागाच्या आकाराबद्दल समाधानी नाही, अधिक व्यायामाद्वारे वाढवण्याचे तिचे ध्येय आहे.

आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर याबाबत नथी किहाराने अनेक पोस्ट केल्या आहेत. तिने विजेतेपद पटकावल्यानंतर एक फोटो अपलोड केला आहे. ज्यावर हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. किहाराचे इंस्टाग्रामवर ५ लाख ६० हजार फॉलोअर्स आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टवर हजारो वापरकर्ते प्रतिक्रिया देतात.