पोर्शेची टायकन इव्ही व मेकन फेसलीफ्ट भारतात लाँच

जर्मन लग्झरी कार निर्मात्या पोर्शेने त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार टायकन इव्ही अखेर भारतात १२ नोव्हेंबर रोजी लाँच केली आहे. भारतात या कारची बेसिक प्राईस १ कोटी ५० लाख रुपये असून ही इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार जगात काही निवडक बाजारात यापूर्वी उपलब्ध झालेली आहे. याचबरोबर कंपनीने मेकन फेसलिफ्ट ८३.२१ लाख रुपये बेसिक प्राईस सह भारतात सादर केली आहे.

पोर्शेची इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार दोन बॉडी शेप मध्ये असून टायकन सलून व टायकन टूरीस्मो क्रॉसओव्हर असे हे दोन प्रकार आहेत. पोर्शेच्या स्पोर्ट्स रेंज मधली ही सर्वात शक्तीशाली स्पोर्ट्स कार आहे. सलून २.८ सेकंदात ० ते १०० किमी वेग घेते तर टुरिस्मो २.९ सेकंदात हा वेग घेते. एकदा फुल चार्ज केल्यावर ती ४८४ किमी अंतर कापू शकते असा दावा केला जात आहे.ओव्हरक्रॉस टूरीस्मो ऑफरोड ड्रायव्हिंग साठी सक्षम असून तिचा टॉप स्पीड ताशी २४० किमी आहे.

मेकन मॉडेल मध्ये कंपनीने काही कॉस्मेटिक बदल केले असून इंटेरियर थोडे नव्या पद्धतीचे आहे. तिची तीन व्हेरीयंट सादर झाली असून स्टँडर्ड, मेकन जीटीएस आणि मेकन अशी हि व्हेरीयंट आहेत. एन्ट्री लेवेल मेकन साठी २.० लिटर टर्बो चार्ज्ड फोर सिलिंडर इंजिन दिले गेले असून ० ते १०० किमीचा वेग घेण्यास तिला ६.२ सेकंद लागतात. या कारचा टॉप स्पीड ताशी २३२ किमी असून तिला ७ स्पीड ड्युअल क्लच ट्रान्समिशन, ऑल व्हील ड्राईव्ह आहे.