यंदाच्या फेस्टीव्ह सिझनमध्ये ६५ हजार कोटींची ऑनलाईन विक्री
देशात नुकत्याच पार पडलेल्या फेस्टीव्ह सिझन मध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुमारे ९.२ अब्ज डॉलर्स म्हणजे ६५ हजार कोटींची विक्री झाली असून गतवर्षीच्या एकूण ऑनलाईन विक्रीपेक्षा ती २३ टक्के जास्त आहे. कन्सल्टिंग फर्म रेडसीर ने शुक्रवारी या संदर्भात रिपोर्ट दिला आहे.
या रिपोर्ट नुसार यंदाच्या वर्षात फेस्टीव्ह सिझन दरम्यान ९.६ अब्ज डॉलर्सचे ग्रॉस मर्चेनडाइज व्हॅल्यु (जीएमव्ही) मिळाल्याचा अंदाज असून गतवर्षी हा आकडा ७.५ अब्ज डॉलर्स होता. रिपोर्ट नुसार नवीन मॉडेल्स आणि सहज वित्त सहाय्य असे अनेक पर्याय ग्राहकांना उपलब्ध होते. मोबाईल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर यंदा सर्वाधिक विक्री झाली आहे. त्यातही कोविड १९ लॉकडाऊन नंतर अनेक महिन्यांनी ग्राहक घराबाहेर पडले आणि त्याचा सर्वाधिक फायदा फॅशन श्रेणीतील उत्पादनांना मिळाला. फॅशन श्रेणीतील उत्पादनात प्रथमच सुधारणा दिसून आली.
त्यामानाने घरगुती वापराच्या वस्तू, इलेक्ट्रोनिक समान, सजावटीच्या वस्तूंची मागणी थोडी कमी झाल्याचेही दिसून आले आहे.