तुम्ही खरेदी केलेला आयफोन बनावट तर नाही ना! असे चेक करा
स्मार्टफोन क्षेत्रात सर्वाधिक लोकप्रिय आणि विक्री होणाऱ्या प्रीमिअर स्मार्टफोन मध्ये आयफोनचा नंबर पहिला आहे. भारतात सुद्धा आयफोन लोकप्रिय असून हे फोन युजर सिक्युरिटीला प्राधान्य देऊन तयार केलेले आणि चांगली गुणवत्ता व अन्य फोन पेक्षा वेगळी फीचर्स असलेले म्हणून ओळखले जातात. आयफोनला जगभरातून प्रचंड मागणी असल्याने फ्रॉड करणाऱ्यांना मोठी संधी मिळाली असून त्यामुळे बाजारात नकली आयफोन आणि अॅपल अॅक्सेसरीजची विक्री केली जात असल्याचे दिसून येत आहे.
हे बनावट आयफोन आणि अॅपल अॅक्सेसरीज इतक्या हुबेहूब आहेत की चटकन खऱ्या आणि बनावट आयफोन मधील फरक समजू शकत नाही. त्यासाठी काही टिप्स खास आयफोन ग्राहकांसाठी देत आहोत.
सर्व प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे कि खरा आणि बनावट आयफोनच्या परफेक्शन मध्ये फरक आहे म्हणजे बनावट आयफोनचे हार्डवेअर कमजोर आहे. ओरिजिनल आयफोन मध्ये हार्डवेअर मेटल किंवा काचेत आहे. मॅट फिनिश हायएंड मॉडेलवर सुद्धा हाच फरक आहे. दुसरे म्हणजे आयफोनच्या मॉडेल नुसार ठराविक निवडक रंगात ओरिजिनल आयफोन येतात. या रंगांची नक्कल करणे इतके सोपे नाही. त्यामुळे फोन खरेदी करताना शक्यतो स्थानिक अॅपल स्टोरमधून तेथील फोनचा लुक, फील पाहावा तसेच किंमत सुद्धा जाणून घ्यावी. वापरलेला आयफोन कमी किमतीत मिळत असेल तर नक्कीच त्यात काही गोची आहे असे समजावे.
अॅपलच्या अधिकृत वेबसाईटवर सर्व प्रमाणित आयफोन आयएमई सिरीयल नंबर हवा. फोन नवा आहे कि जुना हे सेटिंग वरून कळून येते. सेटिंग सामान्य असेल तर स्क्रोल केल्यावर जोपर्यंत सूचीबद्ध आयएमईआय नंबर येत नाही किंवा असा नंबर नसेलच तर तो फोन बनावट असु शकतो. अॅपलच्या अधिकृत ओएस ऐवजी अनेकदा अँड्राईड ओएस असून शकते. पण कळून येत नाही कारण लिहिताना आयओएस असे लिहिलेले दिसते. अश्यावेळी विक्रेत्याला फोन सिरी काम करतोय का हे दाखवायला सांगावे. आयफोन बिल्टइन सिरी सह येतात.
आयफोनला मायक्रोएसडी कार्ड स्लॉट नाही हे लक्षात ठेवावे. असा स्लॉट असेल तर आयफोन बनावट आहे. अॅपल अॅक्सेसरिज घेताना पॉवर अॅडॉप्टर, चार्जर यांचे पॅकेज योग्य आहे ना याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.