जिओ लॅपटॉप एन्ट्री साठी तयार?

जिओ फोन नेक्स्ट लाँच नंतर जिओ लॅपटॉपची एन्ट्रीसाठी तयारी झाली असल्याच्या बातम्या येत असून गिक बेंचवर जिओ बुक पाहिले गेले आहे. हे मिडिया टेक एमटी ८७८८ एसओसी प्रोसेसर सह असू शकते असा अंदाज वर्तविला जात आहे. गिकबेंचचे लिस्टिंग खरे मानले तर जिओ बुक २ जीबी रॅम व अँड्राईड ११ ओएस वर काम करेल. यापूर्वी हा लॅपटॉप ब्युरो ऑफ इंडिअन स्टँडर्ड सर्टिफिकेशन वेबसाईटवर दिसला होता.

मॉडेल नंबर आधारावर असे सांगितले जात आहे कि जिओ बुक तीन व्हेरीयंट मध्ये असेल. नव्या माहिती नुसार कंपनीने बुक परफॉर्मन्स इंटरनल टेस्टिंग केले आहे. त्यामुळे आगामी काही महिन्यात जिओ बुक मार्केट मध्ये एन्ट्री करेल. काही दिवसापूर्वी मॉडेल नं. एनबी १११८ क्यूएमडब्ल्यू, एनबी ११४८ क्यूएमडब्ल्यू व एनबी १११२ एमएमची जिओ बुक बीआयएसवर पाहिली गेली आहेत. यातील एनबी १११२एमएम जिओ बुक गिक बेंच वर लिस्ट केले गेले आहे.

जिओ बुकची काही स्पेसिफिकेशन सुद्धा लिक झाली असून त्यानुसार २ जीबी रॅम, ३२ जीबी स्टोरेज, एचडी डिस्प्ले तर टॉप एंड व्हेरीयंट साठी ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असेल. कनेक्टीव्हिटी साठी फोर जी एलटीई कनेक्शन, ड्युअल बँड वायफाय व एचपीएम १ऑप्शन असतील.