न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; अजिंक्य रहाणे करणार नेतृत्व


नवी दिल्ली – भारतीय संघाची न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी घोषणा करण्यात आली आहे. कर्णधारपद विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आले आहे. तर दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली असून अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.


रहाणे कानपूर येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीत संघाचे नेतृत्व करणार आहे. मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली संघाची कमान सांभाळणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि ऋषभ पंत यांना विश्रांती देण्यात आली आहे.

न्यूझीलंड कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ: अजिंक्य रहाणे (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशात शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.