‘या’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार शाहरुखची मुलगी आणि सैफचा मुलगा ?


जेवढे बॉलीवूड कलाकार चर्चेत असतात तेवढीच त्यांची मुले देखील कायम चर्चेत असतात. त्याचबरोबर बॉलीवूडमध्ये हे स्टार किड्स कधी पदार्पण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असते. आता बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुखची मुलगी सुहाना खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे म्हटले जात आहे. दिग्दर्शिका जोया अख्तरच्या चित्रपटातून ती पदार्पण करणार असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत.

सोशल मीडियावर जोया अख्तर ही प्रचंड सक्रिय असते. तिने नुकतीच तिच्या आगामी चित्रपट ‘द आर्चीज’ची घोषणा केली आहे. आर्ची कॉमिक्सवर आधारित हा चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त नंदा आणि बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जोयाने आर्ची कॉमिक्सचे काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्याचे या स्क्रीनशॉटमध्ये आहे. त्यामुळे तरुणांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. पण चित्रपटात कोणते स्टारकिड्स दिसणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

जोया अख्तर आणि रीमा कागती ‘द आर्चीज’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटात चार मित्रांचा लव्ह ट्रँगल दाखवण्यात येणार आहे. हा एक म्युजिक ड्रामा असल्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.