सलमान खानच्या ‘अंतिम’चे आयटम सॉन्ग तुमच्या भेटीला


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला बॉलिवूडच्या भाईजानचा अर्थात सलमान खानचा ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरुन पसंती दिली आहे. दरम्यान, या चित्रपटातील एक आयटम सॉन्ग आता रिलीज करण्यात आहे.


आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सलमानने हे आयटम सॉन्ग शेअर केले आहे. या गाण्याचे बोल चिंगारी असे आहे. या गाण्यात वलूचा डिसूजा ही दिसत आहे. या गाण्याची कोरिऑग्राफी कृति महेशने केली आहे. या गाण्यात प्रेक्षकांना लावणी पाहायला मिळणार आहे. बॉलिवूडची लोकप्रिय गायिका सुनिधी चौहान हे गाणे गायले आहे. तर या गाण्याला हितेश मोडक संगीतबद्ध यांनी केले आहे. हे गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

‘चिंगारी’ आधी ‘अंतिम’ चित्रपटातील ‘विघ्नहर्ता’, ‘मेरे भाई का बर्थडे’ आणि ‘होने लगा’ ही गाणी रिलीज करण्यात आली आहेत. ‘होने लगा’ या गाण्यात आयुष शर्मा आणि मगिना मकवाना यांचा रोमान्स पाहायला मिळत आहे. हे गाणे रिलीज होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. ‘अंतिम’चे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली आहे. तर सलमान या चित्रपटात सरदार पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे. प्रेक्षक या चित्रपटाची प्रतिक्षा करत आहेत. २६ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.