फ्रांस मध्ये करोनाची पाचवी लाट
जगाला जणू वेठीस ठरणाऱ्या करोनाच्या वेगळा नियंत्रण घालण्यासाठी लसीकरण मोहिमा राबविल्या जात आहेत. मात्र तरीही करोनाचा धोका कायम राहिला असून फ्रांस मध्ये करोनाची पाचवी लाट आल्याचे फ्रांसचे आरोग्य मंत्री ऑलीव्हीअर वरन यांनी म्हटले आहे. ते म्हणाले आमच्या शेजारी देशात करोना लाट आहेच पण फ्रांस मध्ये सुद्धा पाचव्या लाटेची सुरवात झाली आहे. ही लाट पूर्वीच्या लाटेपेक्षा अधिक धोकादायक असू शकते असा इशारा वेरन यांनी दिला असून सर्व नागरिकांनी करोना प्रोटोकॉलचे कसोशीने पालन करावे असे आदेश दिले आहेत. वेरन यांच्या म्हणण्यानुसार शेजारील देशांची करोना आकडेवारी पहिली तर ही लाट मागच्य्यापेक्षा गंभीर स्वरुपाची असेल अशी शक्यता आहे.
फ्रांस मध्ये ऑक्टोबर पासून करोना केसेस मध्ये वाढ होत आहे. लसीकरण, मास्क आणि स्वच्छता आणि अन्य नियमावली यातूनच देशाला करोनाचा सामना करायचा आहे. फ्रांस मध्ये ७६.४६ लाख करोना केसेस असून आत्तापर्यंत १.१९ लाख रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. जगभरात करोनाची दुसरी लाट पहिल्या लातेपेक्षा जास्त खतरनाक ठरली आणि आत्ता युरोपियन देश सर्वाधिक प्रभावित आहेत. ब्रिटन, फ्रांस, बेल्जियम, इटली,नेदरलंड, स्पेन, स्वीडन या देशात करोनाने जास्त उच्छाद मांडला आहे. अमेरिकेत सुद्धा गेल्या वर्षाच्या ऑक्टोबर डिसेंबर मध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेने लाखो जीव घेतले आहेत. रशियात या दरम्यान चौथी लाट आल्याचे शक्यता वर्तविली जात असून तेथे एका दिवसातील करोना मृतांची संख्या १२३७ वर गेली आहे.