एनर्जी आणि पोषण देणारे ड्रिंक- गरमागरम दुध आणि गूळ
करोना नंतर बहुतेक नागरिक प्रकृतीविषयी अधिक जागरूक झाले आहेत. आरोग्यपूर्ण आणि पोषक आहाराकडे अधिक लक्ष दिले जात असून त्यात सकाळचा नाश्ता अधिक पोषक कसा करता येईल याकडे लक्ष दिले जात आहे. मात्र एक मोठा वर्ग असाही आहे ज्यांना सकाळच्या नाश्ता करण्यास वेळ मिळत नाही. मग अशा लोकांसाठी एक चांगला पर्याय सुचविला गेला आहे.
सकाळच्या वेळी गरम दुध आणि त्यात गूळ घालून प्यायले तर हे एनर्जी आणि पोषण देणारे चांगले ड्रिंक बनते असे तद्न्य सांगतात. अश्या गूळयुक्त दुधाचे अनेक फायदे आहेत.दुधात जीवनसत्व ए, बी, कॅल्शियम, प्रोटीन, लॅक्टीक अॅसिद आहे तर गुळात ग्लुकोज, सुक्रोज, आयर्न, अनेक प्रकारची खनिजे आहेत. या दोन्हीच्या मिश्रणांतून एक पूर्ण पेय तयार होते. त्याला आपण कम्प्लीट ड्रिंक म्हणू शकतो. शरीराच्या गरजा हे पेय त्वरित पूर्ण करते.
या पेयापासून खूप फायदे मिळतात. हे पेय रोज प्यायले तर शरीर सुद्धृड बनते आणि रक्त शुद्धी होते. दुधात साखर घालून प्यायल्यास वजन वाढीचा धोका असतो पण दुध आणि गूळ यांचे मिश्रण वजन कमी करते. यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात, पचन शक्ती वाढते. सांधे दुखी असेल तर वेदना कमी होऊन आराम मिळतो. त्वचेच्या समस्या दूर होतात आणि त्वचेचा पोट सुधारतो. महिलांना मासिक पाळी मध्ये होणारी पोटदुखी आणि पाय दुखणे कमी होते.