तुम्ही पाहिला आहे का असा महागडा वेडिंग केक


सुंदर वेडिंग गाऊन ब्रिटनमध्ये लोकांनी पाहिला पण त्याला जवळ जाऊन स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्यानंतर हे लोक चकित झाल्याशिवाय राहिले नाहीत. वास्तवामध्ये वर दाखवलेल्या फोटोत ही वेडिंग गाऊन घातलेली एक मुलगी नाही तर संपूर्ण एक केक होता. याची किंमत तब्बल ६.५ कोटी सांगण्यात येत आहे.

ब्रिटनच्या डॅबी विंघेम्सने हा केक डिझाईन केला असून १००० खरे मोती, ५००० फुले, १००० अंडी आणि २५ किलो चॉकलेटचा वापर हा केक तयार करण्यासाठी करण्यात आला आहे. केकचे एकूण वजन १०० किलो आहे.

तुम्हाला जर असे वाटत असेल की हा जगातील सर्वात महाग केक आहे तर जरा थांबा. आणखी एक रेकॉर्ड हाच केक तयार करणाऱ्या ३६ वर्षीय डॅबीच्या नावावर आहे. ५० मिलियन पाउंड म्हणजेच ४४५ कोटी रुपये किमतीचा केक डॅबीने बनवला आहे. दुबईत होणाऱ्या एका शोसाठी डॅबीने हा केक तयार केला होता.

Leave a Comment