आज बदलतेय युट्यूबचे डिसलाईक बटण

अनेक दिवस चाललेल्या वादविवादाचा परिणाम म्हणून युट्यूब आज त्यांच्या साईटवरचे डिसलाईक बटण बदलत असल्याची घोषणा झाली आहे. यापुढे युजर्स कुणाचे ट्रोलिंग किंवा बदनामी साठी या बटणाचा वापर करू शकणार नाहीत असे स्पष्ट केले गेले आहे. या बटणावरून गेले काही महिने सतत वादविवाद सुरु होते.

मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन कि बात’ला युट्यूब वर १० लाख डिसलाईक मिळाले होते. त्यावरून हा कॉंग्रेसचा पराक्रम आहे असे आरोप केले गेले होते. कारण या १० लाख डिसलाईक पैकी ९८ टक्के डिसलाईक परदेशातून केले गेले होते तर भारतातून फक्त २ टक्के डिसलाईक होते. त्यामुळे अखेर युट्यूबने मार्च मध्ये डिसलाईक बटनात बदल केला जाईल अशी घोषणा केली होती ती आता प्रत्यक्षात आणली आहे.

द व्हर्जच्या रिपोर्टनुसार या डिसलाईक बटणाचा वापर कुणाविरुध्ह मोहीम छेडणे, किंवा बदनामी करण्यासाठी करता येणार नाही. हे डिसलाईक बटण असेल पण पब्लीकली ते दिसणार नाही. म्हणजे किती लोकांनी डिसलाईक केले तो आकडा दिसणार नाही. मात्र कंटेन्ट क्रिएटर तो आकडा पाहू शकतील. यामुळे त्यांना अचूक फीडबॅक मिळू शकेल आणि बटणाचा गैरवापर टळेल असा दावा केला जात आहे. डिसलाईक कौंट हाईड फक्त युट्यूबवरच नाही तर गुगल बरोबर फेसबुक, इन्स्टाग्राम तर्फे सुद्धा केला जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.