नेटकरी संतापले तारक मेहतामधील दयाबेनच्या पतीवर


गेली १३ वर्षे प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करणारी छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. तसेच प्रेक्षकांना मालिकेतील दयाबेन आणि जेठालालची जोडी विशेष आवडते. पण गेले काही दिवस मालिकेत दयाबेन ही भूमिका साकारणारी दिशा वकाशी दिसत नाही. दरम्यान, दयाबेनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांनी या फोटोवरुन दिशाच्या पतीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

दिशा २०१७ मध्ये मॅटरनिटी लीव्हवर गेली होती. ती तेव्हापासून तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेपासून लांब असल्याचे पाहायला मिळाले. ती सध्या काय करते? हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अशातच दिशाचा एक फोटो समोर आला आहे. ती या फोटोमध्ये मुलीसोबत दिसत आहे. तिचा हा फोटो नो मेकअप लूकमधील आहे. तिचा हा फोटो पाहून तिचे वजनही काहीसे वाढलेले दिसत आहे. तसेच तिच्या चेहऱ्यावर थकवाही पाहायला मिळत आहे. तिला या लूकमध्ये ओळखणे ही फार कठीण झाले आहे.

दिशाच्या या फोटोवर एका यूजरने कमेंट करत तिला सुनावले आहे. तिचे करिअर तिच्या पतीने उद्धवस्त केले आहे. हे फार वाईट असल्याची कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने तुम्ही मालिकेत पुन्हा कधी दिसणार असा प्रश्न विचारला आहे. अभिनेत्री दिशा वकानीने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत दयाबेन ही भूमिका साकारली आहे. पण दिशा गेल्या तीन वर्षांपासून मालिकेत दिसत नसल्यामुळे दयाबेनला पुन्हा मालिकेत पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. ती पुन्हा कधी मालिकेत दिसणार असे अनेकदा निर्मात्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारले जाते.