हॉलीवूड, बॉलीवूड, टॉलीवूड मधील ‘वूड’चा हा आहे अर्थ

जगभरात सिनेमा उद्योग हा प्रचंड उलाढाल असलेल्या उद्योगात सामील आहे. दरवर्षी विविध देशात, विविध भाषांत शेकडो चित्रपट बनतात आणि त्यातून लाखो, करोडो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतात. भारतचे बॉलीवूड जगातील मोठे चित्रपट निर्मिती क्षेत्र असून त्याची उलाढाल वर्षाला १८३ अब्ज डॉलर्स ची आहे. विविध देशातील चित्रनगरी हॉलीवूड, बॉलीवूड, टॉलीवूड, कॉलीवूड, लॉलीवूड, सँडलवूड अश्या नावाने प्रसिद्ध आहेत. यातील वूड या शब्दाचा नेमका अर्थ काय आणि हा शब्द यात कसा आला याची हकीकत मनोरंजक आहे.

सर्वप्रथम वूड हा शब्द हॉलीवूड नावामध्ये वापरला गेला. म्हणजे त्याची सुरवात हॉलीवूड पासून झाली. एच.जे विटले याने ही सुरवात केली. विटले याला हॉलीवूडचा पिता म्हटले जाते. अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरात मध्यवर्ती क्षेत्रात हॉलीवूड नावाचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्याच्या नावावरूनच अमेरिकन चित्रनगरीला हॉलीवूड नाव मिळाले. मध्यवर्ती भाग असा वूड या नावामागचा अर्थ होता. त्यानंतर जगभरात चित्रपट बनू लागले आणि त्या त्या देशातील किंवा देशाच्या भागातील चित्रनगरी त्यांच्या नावासमोर वूड लावू लागल्या.

हिंदी चित्रपट सृष्टीचे मुख्य ठिकाण होते बॉम्बे. म्हणून या शहराच्या नावावरून बॉलीवूड असे नाव आले. बॉलीवूड म्हणजे हिंदी सिनेमाची जणू गढी. पाकिस्तानचे लाहोर म्हणजे पाकिस्तानी चित्रपट निर्मितीचा गढ. त्यामुळे तेथील चित्रउद्योग लॉलीवूड नावाने ओळखला जाऊ लागला. येथे पंजाबी आणि उर्दू भाषेतील चित्रपट बनतात.

तमिळ फिल्म उद्योगाने कॉलिवूड हे नाव घेतले तर कन्नड चित्रपट उद्योगाला सँडलवूड नाव मिळाले. तेलगु फिल्म इंडस्ट्रीने त्यांची ओळख टॉलीवूड अशी बनविली आहे.