नवाब मलिक यांच्याविरोधात अ‍ॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी वानखेडे यांच्या आत्यांचे पोलिसांना निवेदन


औरंगाबाद – औरंगाबादेतील समीर वानखेडे यांच्या आत्यांनी मुकुंदवाडी पोलिसांना नवाब मलिक यांच्याविरोधात अ‍ॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा म्हणून निवेदन दिले आहे. समीर वानखेडे यांच्या आत्यांचे गुंफाबाई गंगाधर भालेराव असे नाव आहे.

गुंफाबाई भालेराव म्हणाल्या, समीर वानखेडे व आमचे सर्व कुटुंबियांची जात नवबौद्ध असून नवाब मलिक यांनी अनेक लोक सेवकांना खोटी माहिती देऊन त्यांच्या अधिकाराचा वापर होण्यास प्रवृत्त केल्यामुळे समीर वानखेडे व आम्हा सर्व कुटुंबियांना हानी पोहोचवली आहे. आम्हाला असे त्रास देण्याचे कृत्ये केलेले आहे. तसेच आम्ही अनुसुचित जातीचे असुनही आम्ही मुस्लिम जातीचे देखील आहोत,असा खोटा आरोप केला असल्याचा आरोप गुफांबाई भालेराव यांनी नवाब मलिकांवर केला आहे. त्यामुळे तक्रार नोंदवून चौकशी करुन नवाब मलिक यांच्या विरुद्ध त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली केली आहे.

प्रसार माध्यमांद्वारे नवाब मलिक यांनी जाहीर केले की, समीर वानखेडे हे जन्मत: मुस्लिम जातीचे असून त्यांचे वडीलांचे नाव दाउद आहे. त्याचप्रमाणे त्यांचे कुटुंबिय पण बोगस आहे, समीर वानखेडे यांनी खोटे जातीचे प्रमाणपत्राचे आधारे नोकरी मिळविली आहे.