विराट कोहलीची कर्णधार म्हणून शेवटची पोस्ट


दुबई – नामिबियाचा टीम इंडियाने 9 गडी राखून पराभव करुन विश्वचषक मोहिमेची विजयाने सांगता केली. भारताच्या गटातून पाकिस्तान आणि न्यूझीलंडने आधीच सेमीफायनल गाठल्यामुळे या लढतीत केवळ औपचारिकता उरली होती. संपूर्ण विश्वचषकात टीम इंडियाने साजेशी कामगिरी केली नसली, तरी शेवटच्या तीन सामन्यात टीम इंडियाला चांगली कामगिरी करता आली. दरम्यान कर्णधार या नात्याने विराट कोहलीचा हा अखेरचा टी-20 सामना होता. तर रवी शास्त्रींच्या प्रशिक्षकपदाचा कालावधीही काल संपल्यामुळे या दोघांना टीम इंडियाकडून विजयी भेट मिळाली.


नामिबियाविरुद्धच्या सामन्यानंतर टी-20 कर्णधार म्हणून सोशल मीडियावर विराटने शेवटची पोस्ट शेअर केली आहे. तो म्हणाला, आम्ही आमचे ध्येय साध्य करण्यासाठी एकत्रितपणे निघालो. दुर्दैवाने आम्ही कमी पडलो आणि एक संघ म्हणून आमच्यापेक्षा कोणीही जास्त निराश नाही. तुम्हा सर्वांकडून मिळालेला पाठिंबा अप्रतिम आहे आणि आम्ही त्यासाठी आभारी आहोत. दमदार पुनरागमनासाठी आम्ही पुन्हा एकदा सज्ज होऊ आणि आमचे सर्वोत्तम पाऊल टाकू. जय हिंद.