दिल्लीत ‘अनलॉक’नंतर महिलांवरील अत्याचार वाढले


नवी दिल्ली – कोरोनाचे संकटाचे ढग हळूहळू कमी होत असतानाच राजधानी दिल्लीत आता पुन्हा एकदा महिलांवरील अत्याराचे गुन्हे वाढू लागले आहेत. ६ ते २० टक्के वाढ या गुन्ह्यांमध्ये झाली आहे. दिल्ली पोलिसांच्या आकडेवारीनुसार, अनलॉकनंतर विनयभंग आणि बलात्काराच्या घटनांमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

यासंदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत दिल्ली पोलिसांनी १,४२९ बलात्काराचे गुन्हे नोंदवले आहेत, तर प्रकरणे या वर्षी ऑक्टोबरपर्यंत १७२५ नोंदवण्यात आली आहेत. विनयभंगाच्या घटनांमध्ये २०.४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विनयभंगाचे या वर्षी ऑक्टोबरपर्यंत २,१५७ गुन्हे दाखल झाले असून गेल्या वर्षी १,७९१ गुन्हे दाखल झाले होते.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनानंतर दिल्ली अनलॉक झाल्यापासून ही वाढ झाली आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये २०१९ च्या तुलनेत गेल्या वर्षी बलात्काराच्या घटनांमध्ये २८ टक्के घट झाली होती. त्याचप्रमाणे विनयभंगाच्या घटनांमध्ये ३२.१९ टक्क्यांची घट झाली आहे. २,१६८ बलात्काराचे गुन्हे २०१९ मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत दाखल झाले. गेल्या वर्षी जे २१ टक्क्यांनी घसरून १,६९९ वर आले. २०२० मध्ये दिल्लीत महिलांचे अपहरण आणि पळून जाण्याच्या एकत्रित २,३४४ प्रकरणे नोंदवण्यात आली. यावर्षी अशा ३,३४२ प्रकरणांची नोंद झाली आहे.

आकडेवारीनुसार, यात ९७ टक्क्यांहून अधिक प्रकरणांमध्ये आरोपी पीडितांना ओळखत होते, तर सुमारे २ टक्के बलात्कार अनोळखी व्यक्तींकडून झाल्याची नोंद झाली आहे. दरम्यान महिलांविरोधातील गुन्ह्यांबाबत शून्य सहनशीलता धोरण स्वीकारण्यास दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले आहे. बलात्काराच्या प्रकरणांच्या तपासावर थेट देखरेख करण्यास आणि पीडित अल्पवयीन असलेल्या प्रकरणांकडे अधिक लक्ष देण्यास सर्व जिल्हा डीसीपींना त्यांच्या वतीने सांगितले आहे. अधिका-यांनी सांगितले की ज्या भागात महिलांविरोधात अधिक गुन्हे नोंदवले गेले आहेत, त्यांचा नकाशा तयार करण्यासाठी एक अभ्यास केला गेला आहे आणि कारवाई केली जात आहे.