फरहान अख्तर करणार लक्ष्मी पूजा करण्यावरून ट्रोल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई


बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. त्यामुळे फरहानला बऱ्याचवेळा सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. फरहानला नुकताच दिवाळी निमित्त शेअर केलेल्या फोटोंमुळे पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आले आहे. पण, यावेळी फरहान ट्रोल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहे.


४ नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पूजनच्या निमित्ताने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लक्ष्मी पूजनाचे काही फोटो फरहानने शेअर केले होते. फरहान या फोटोमध्ये त्याची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरच्या कपाळावर टिळा लावत आहे. तर त्याच्या कुटुंबातील काही सदस्य त्या फोटोत दिसत आहेत. त्याने हा फोटो शेअर करत सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. काही नेटकऱ्यांनी त्याच्या या फोटोवर फरहान आणि त्याच्या कुटुंबाची स्तुती केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे.

जावेद अख्तर या ट्रोलिंगला पाहता म्हणाले, या द्वेषाने भरलेल्या कमेंटकडे दुर्लेक्ष करणे म्हणजे या ट्रोर्ल्सला खेळायला एक खेळणे देणे. अशा ट्रोलिंगकडे त्यांचे कुटुंब सहसा लक्ष देत नाही, पण ट्रोलिंगचे प्रमाण आता खूप वाढले आहे. याच कारणामुळे त्यांनी त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात ‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, सर्व देवांच्या एकतेवर अख्तर कुटुंब विश्वास ठेवतात आणि ट्रोल्सला त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. फरहान अख्तरचे वडील मुस्लिम आणि आई पारशी असल्यामुळे तो ईदप्रमाणेच दिवाळी साजरी करतो.