फडणवीसांनी मलिकांचे प्रकरण स्वतःवरील आरोप दाबण्यासाठी बाहेर काढले – प्रकाश आंबेडकर


पुणे – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधला आहे. फडणवीसांनी स्वतःचे प्रकरण दाबण्यासाठी मलिकांचे प्रकरण काढल्याचे आंबेडकर म्हणाले. नवाब मलिकांवर फडणवीसांनी गंभीर आरोप केले आहेत. अंडरवर्ल्डसोबत मलिकांचे संबंध असल्याचे फडणवीस म्हणाले होते. त्यावरूनच आता आंबेडकर यांनी फडणवीसांवर निशाना साधला आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मलिकांनी जमीन घेतल्याची माहिती होती. त्यावेळी त्यांनी हे प्रकरण समोर का आणले नाही. स्वतःचे प्रकरण दाबण्यासाठी मलिकांचे प्रकरण काढले.आता न्यायालयाची भूमिका महत्वाची आहे. न्यायालयाने फडणवीसांवर दाखल असलेले सर्व प्रकरणे निकाली काढावे, असेही आंबेडकर म्हणाले.