मोठा खुलासा: लखीमपुरमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रानेच केला होता गोळीबार


नवी दिल्ली – एक मोठा उत्तर प्रदेशच्या लखीमपुर येथे घडलेल्या हिंसाचाराप्रकरणी खुलासा समोर आला आहे. हिंसाचाराच्या दिवशी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष याने स्वत:च्या हाताने बंदूक आणि रायफलद्वारे गोळीबार केल्याची माहिती एफएसएलच्या अहवालातून समोर आली आहे.

गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आरोपी आशीष आणि त्याचा मित्र अंकित दास यासह अन्य चौघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांचे असे म्हणणे आहे की, गन, पिस्तूल आणि रायफल अंकित दास आणि आशीष मिश्राकडे रिपीटर आढळून आली आहे. त्यात एसआयटीपासून वाचण्यासाठी अंकित दासने अगोदरच गोळीबार केल्याची कबुली दिली आहे.

शेतकरी आंदोलनातील काही शेतकऱ्यांनी 3 ऑक्टोंबरला केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या विरोधात काळे झेंडे दाखवत, निदर्शने केली होती. त्याचदरम्यान एका गाडी चालकाने काही शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली. त्या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्या गाडीतील ड्राइवरसह आणखी चार जणांना शेतकऱ्यांनी मारहाण केली, त्यात चौघांचा मृत्यू झाला होता. त्या मारहाणीत एका पत्रकाराचा देखील मृत्यू झाला आहे. या हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रा यासह अन्य 15 जणांविरोधात शेतकऱ्यांची हत्या करण्याचे आरोप लावण्यात आले आहे.