लग्नानंतर विकी आणि कतरिना एवढे भाडे देऊन थाटणार संसार


बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल विवाहबंधनांत अडकणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले आहे. त्या दोघांचा साखरपुडा झाल्याचे काही दिवसांपूर्वी बोलले जात आहे. त्यानंतर ते दोघे येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यांच्या लग्नाची तयार सुरु असल्याचे सांगण्यात येत होते. त्यात त्यांचा रोका झाल्याचे ही सांगण्यात येत आहे. दरम्यान, त्या दोघांनी लग्नानंतर एकत्र राहण्यासाठी एक घर बघितल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून विकी आणि कतरिना घराच्या शोधात होते आणि आता त्यांना त्यांचे स्वप्नातील घर सापडले आहे. मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या एक आलिशान अपार्टमेंट त्यांनी भाडेतत्वावर घेतले आहे. काही वृत्तांनी दिलेल्या वृत्तांनुसार, हे दोघे अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे शेजारी असतील.

यासंदर्भातील वृत्त ‘इंडिया दुडे’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, रिअल-इस्टेट पोर्टलचे प्रमुख वरुण सिंग म्हणाले, ६० महिन्यांसाठी म्हणजे ५ वर्षांसाठी विकीने जुहूच्या राजमहल या इमारतीमध्ये एक अपार्टमेंट भाडेतत्वावर घेतले आहे. जुलै २०२१ पासून ८व्या मजल्यावरील अपार्टमेंट त्याने भाड्याने घेतले. विकीने १ कोटी ७५ लाख रुपये सिक्योरिटी डिपॉझिट म्हणून दिले आहे. सुरुवातीचे ३६ महिन्यांचे भाडे ८ लाख रुपये प्रति महिना असणार आहे. त्यानंतर पुढचे १२ महिने हे भाडे ८ लाख ४० हजार असणार आहे. तर पुढचे आणि शेवटच्या १२ महिन्यांचे भाडे हे ८ लाख ८२ हजार दरमहा असणार आहे.

तसेच ‘बॉलिवूड लाईफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, ते दोघेही १ डिसेंबर ते ७ डिसेंबरमध्ये लग्न करतील, असे म्हटले जात आहे. राजस्थानमधील सवाई माधोपूर या ठिकाणच्या सिक्स सेन्सेस राजमहालात या दोघांचे लग्न आयोजित करण्यात आला आहे. त्या दोघांचा विवाह अलिशान आणि भव्यदिव्य पद्धतीने होणार असल्याचीही चर्चा केली जात आहे.