विक्की-कटरीना सवाई माधोपुर मध्ये घेणार सात फेरे, जुहू मध्ये मांडणार संसार

बॉलीवूड अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री कटरीना कैफ यांच्या विवाहाच्या बातम्या येऊ लागल्या असताना हे दोघे डिसेंबरच्या ७ ते १२ तारखेदरम्यान विवाह बंधनात बांधले जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आले आहे. सवाई माधोपुर येथील सिक्स सेन्स बरवाडा फोर्ट हॉटेल मध्ये हा विवाह होत असून त्याचे बुकिंग झाले आहे असेही समजते.

लग्नानंतर हे दोघे त्यांचा संसार मुंबईच्या जुहू मधील एका अलिशान सदनिकेत मांडणार असून ही सदनिका त्यांनी भाड्याने घेतली आहे. त्यासाठी प्रचंड मोठी रक्कम चुकविली गेली आहे. याच अलिशान इमारतीत टीम इंडिया कप्तान विराट आणि अनुष्का यांचे घर आहे. रियल स्टेट पोर्टलचे वरूण सिंग यांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार विक्कीने या घरासाठी सुरक्षा ठेव म्हणून १.७४ कोटी रुपये भरले आहेत. पहिल्या नऊ महिन्यासाठी ८ लाख नंतरच्या १२ महिन्यासाठी ८.४० लाख व त्यानंतरच्या १२ महिन्यासाठी ८.८२ लाख असे प्रतिमाह भाडे सुद्धा भरले गेले आहे.

वर्क फ्रंटचा विचार करायचा तर विक्कीच्या नुकत्याच रिलीज झालेल्या उधमसिंगला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यांचे अन्य काही चित्रपट सुरु आहेत. कटरीनाच्या सूर्यवंशीने सुद्धा जबरदस्त कमाई केली असून हे दोघे सध्या कामात प्रचंड व्यस्त आहेत असेही सांगितले जात आहे.