जपानचे माजी पंतप्रधान शिन्जो आबे यांना पद्मविभूषण
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात २०२१ च्या पद्मपुरस्काराचे वितरण मंगळवारी दुपारी होत असून सोमवार आणि मंगळवार अश्या दोन दिवशी हा कार्यक्रम केला जात आहे. ऐतिहासिक दरबार हॉल मध्ये आज जपानचे माजी पंतप्रधान शिन्जो आबे यांना पद्मविभूषण सन्मान दिला जात आहे तसेच तामिळनाडू चे प्रसिद्ध गायक बालसुब्रह्मण्यम व मौलाना वहीदुद्दीन खान, बीबी लाल व अमेरिकचे नरिंदर सिंग कापणी यांनाही या सन्मानाने गौरविले जात आहे.
सोमवारी राष्ट्रपती कोविंद यांनी विविध राज्यातील पद्मपुरस्कार विजेत्यांचा सन्मान केला. त्यावेळी दिवंगत माजी अर्थमंत्री अरुण जेटली, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि माजी रक्षा मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांना मरणोत्तर पद्मविभूषण सन्मान दिले गेले. क्रीडा क्षेत्रात पीव्ही सिंधू, हॉकी मध्ये राणी रामपाल यांना पदमभूषण तर कला क्षेत्रात कंगना राणावत आणि अदनान सामी यांना पद्मश्री दिली गेली. एअर मार्शल पद्मा बंदोपाध्याय (निवृत्त) यांना चिकित्सा क्षेत्रातील कामगिरीसाठी पदम पुरस्कार दिला गेला. त्या भारतीय वायुसेनेतील पहिल्या महिला एअर मार्शल आहेत. याचबरोबर बांगलादेश मधील दोघांना सुद्धा पद्म पुरस्काराने गौरविले गेले आहे.