मलिकांनी मेहुणीसंदर्भात केलेल्या आरोपांना समीर वानखेडेंचे उत्तर


मुंबई – समीर वानखेडे यांच्या मेहुणीबाबत नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांनंतर वानखेडे यांनी या प्रकरणाशी त्यांचा संबंध कसा काय असू शकतो? असा प्रतिप्रश्न केला आहे. तेव्हा हे प्रकरण झाले, तेव्हा 2008 मध्ये आपण सेवेतही नव्हतो आणि क्रांती रेडकर यांच्याशी 2017 साली विवाह झाला, असे वानखेडे यांनी म्हटल्यामुळे या खटल्याशी किंवा या प्रकरणाशी आपलाकसा संबंध असू शकतो, असा सवाल वानखेडे यांनी केला आहे.

दरम्यान, आज दुपारी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर पत्रकार परिषद घेणार आहेत. क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर रोज नवनवीन आरोप-प्रत्यारोप होत आहेत. आधी नवऱ्यावर आरोप झाल्यानंतर आता क्रांतीच्या बहिणीवर देखील आरोप झाले आहेत. त्यामुळे क्रांती रेडकर आज काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

काल मंत्री नवाब मलिकांनी आर्यन खानच्या किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज असल्याचा मोठा आरोप केला. यामध्ये समीर वानखेडे त्याला मदत करतो, असे नवाब मलिक यांनी म्हटले होते. आज पुन्हा समीर वानखेडेंवर नवाब मलिकांनी आरोपांचा ‘सिलसिला’ कायम ठेवला आहे.