अहमदाबादमधील ‘ओरिओ भजी’वर नेटिझन्सने दिल्या भन्नाट प्रतिक्रिया


‘ओरियो मॅगी’ हा पदार्थ काही दिवसांपूर्वी ट्रेंडमध्ये आलेला होता. आता सोशल मीडियावर ‘ओरिओ पकोडा’ बनवल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. फूड व्लॉगर अमर सिरोही द्वारे चालवल्या जाणार्‍या ‘फूडी इनकार्नेट’ या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर अहमदाबादमधील एका फूड स्टॉलवरील ही क्लिप शेअर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, फूड व्लॉगर स्वतः विचित्र रेसिपीमुळे हैराण झाला.

सिरोहीने पोस्ट केलेल्या व्हिडीओला आत्तापर्यंत १०७,३५३ हून अधिक व्हूज मिळाले आहेत. अहमदाबादमध्ये ही डीश विकली जाते आणि स्थानिक लोकांमध्ये, विशेषतः मुलांमध्ये ही डिश खूप लोकप्रिय आहे. या पकोड्यात ओरिओ आहे. तुमचा माझ्यावर विश्वास नाही? येथे, याकडे एक नजर टाका, फूड ब्लॉगर ओरिओने भरलेले फ्रिटर उघडत असताना क्लिपमध्ये असे म्हणताना ऐकले जाऊ शकते.

युट्युबर व्हिडीओमध्ये पुढे अहमदाबादमधील “रोकड्या भजिया” नावाच्या एका स्टॉलवर पोहोचतो, जिथे डिश सर्व्ह केली जात आहे. अवघ्या ३.२७ मिनिटांच्या क्लिपमध्ये, फूड व्लॉगर दाखवतो की ओरिओ बिस्किट पकोडा कसा बनवला जातो आणि सर्व्ह केला जात आहे. हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर व्हायरल झाला आणि त्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात केली. अनेकांनी विचित्र फूड कॉम्बिनेशनमुळे ही डिश नाकारली, तर काहींनी ओरिओ बिस्किटवर मस्करी करत बिर्याणीमध्येही टाका, असे म्हणत चेष्टा केली.