समीर वानखेडेंमध्ये क्रांती रेडकरला दिसत आहे ‘बाहुबली’!


अभिनेत्री क्रांती रेडकर गेल्या अनेक दिवसांपासून पती समीर वानखेडेमुळे चर्चेत आहे. समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तसेच महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यामधील आरोप प्रत्यारोप सतत सुरु आहे. सोशल मीडियावर क्रांती देखील सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतीच एक पोस्ट क्रांतीने सोशल मीडियावर शेअर केली आहे.


आपल्या ट्विटर अकाऊंटवरून क्रांतीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. समीर वानखेडेंचा हा व्हिडीओ आहे. क्रांतीने शेअर केलेला हा व्हिडीओ एका नेटकऱ्यांने शेअर केला होता. त्यानंतर क्रांतीने हा रिट्वीट केला आहे. बाहुबली हे गाणे या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला सुरु आहे. नवाब मलिक हे त्यांनी केलेल्या वक्तव्यांमध्ये गोंधळून गेले आहेत. आजच्या परिषदेत ते काय बोलत आहेत, तर काही खोटी कारण देत आहेत. आम्ही समीर सर आणि त्यांच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत, असे ट्विट त्या नेटकऱ्याने केले होते. हे ट्विट पाहताच क्रांतीने ते रिट्विट केले.

क्रांतीने या आधी देखील एक ट्विट केल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आले होते. क्रांतीने एक बातमी शेअर केली होती. या बातमीत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल टर्मिनल इथे एनसीबीने ४ कोटी रुपयांची किंमत असलेला हेरॉइन जप्त केले. ही बातमी शेअर करत “शब्बास शेरा” असे कॅप्शन क्रांतीने दिले होते. शब्बास शेरा हे समीर वानखेडेंना क्रांती बोलली आहे. क्रांतीच्या या ट्विटमुळे सोशल मीडियावर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.