जेठालाल झाला आलिशान गाडीचा मालक


छोट्या पडद्यावरील लोकप्रिय तसेच टीआरपीमध्ये अव्वल स्थानी असलेली ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या एक दशकांपासून जास्त काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांची या मालिकेतील प्रत्येक भूमिकेला पसंती मिळाली आहे. तारक मेहतामधील दया आणि जेठालाल या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. अभिनेता दिलीप जोशी हे जेठालाल ही भूमिका साकारतात. दिलीप यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळाते. दिलीप जोशी यांचा एका आलिशान गाडीसोबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


सोशल मीडियावर दिलीप जोशी यांच्या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ब्लॅक कलरची Kia Sonet सबकॉम्पॅक्ट SUV ही गाडी दिसत आहे. 12.29 लाख रूपयांपासून या गाडीची किंमत सुरू होते. दिलीप यांनी ही गाडी दिवाळीला घेतली आहे. या सबकॉम्पॅक्ट SUV गाडीमध्ये काही नवे फिचर्स आहेत. सोशल मीडियावरील दिलीप यांच्या फोटोमध्ये त्यांचे कुंटुंब देखील दिसत आहे.

दिलीप सोशल मीडियावर पत्नी जयमाला जोशी यांच्यासोबतचे फोटो नेहमी शेअर करतात. मालिकेमधील दया ही भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीसोबतच्या दिलीप यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. दिलीप यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, अनेक लोक मला रोज विचारत होते की दिशा माझी पत्नी आहे का? मी त्यांना सांगतो की जयमाला ही माझी पत्नी आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग 28 जुलै 2008 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. ही मालिका गेली 13 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.