राज्यातील दारूबंदीवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक


पाटना – मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिवाळीच्या एक दिवाळीच्या एक दिवस अगोदरपासून बिहामध्ये एक पाठोपाठ एक विषारी दारूच्या घटना आणि ४० पेक्षा अधिक जणांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवरकडक पावले उचलण्यास सुरूवात केल्याचे दिसत आहे. त्यांनी राज्यात दारूबंदीला आणखी प्रभावीपणे लागू करण्यासाठी तीन दिवस अगोदरच मोठे अभियान चालवण्याचे वक्तव्य केले होते. आता या संबंधी चर्चेसाठी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन त्यांनी १६ नोव्हेंबर रोजी केले आहे. असे मानले जात आहे की बैठकीत मुख्यमंत्री दारू माफियांविरोधात मोठी कारवाईची घोषणा करू शकतात.

सोमवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले की, विषारी दारूच्या घटनांमधील दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल. त्यांनी पुढे म्हटले की दारूबंदीतून बऱ्याच प्रमाणात या समस्येवर अंकुश लावला जाऊ शकतो. यामध्ये काहीजणच अडकलेले आहेत, त्यांना देखील जागृत केले जाईल. विषारी दारू प्रकरणात जबाबदार आढळलेल्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. तसेच, त्यांनी अधिकाऱ्यांना हे देखील विचारले की जिल्हा ओलांडून तस्कर कसे काय येतात? आणि दारूवर कडक बंदीचे आदेश दिले. याच दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दारू व्यवसाय करणाऱ्यांविरोधात पोलिसांचा कठोर पवित्रा दिसत आहे. अनेक जिल्ह्यात अभियान चालवून पोलीस सातत्याने दारू भट्ट्या उध्वस्त करत आहेत.