भाजप नेत्यांनी आमच्याबद्दल अनावश्यक टिप्पण्या टाळावे नाहीतर जीभ कापून टाकू – केसीआर


हैदराबाद – भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंदी संजय यांच्यावर तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी रविवारी कडाडून टीका केली आणि राज्यातील शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करण्याचे आश्वासन फसवे असल्याचे म्हटले. यादरम्यान भाजप नेत्यांना आमच्याबद्दल अनावश्यक टिप्पण्या टाळा नाहीतर जीभ कापून टाकू, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. केंद्र सरकारने हे स्पष्ट केले आहे की ते धान्य खरेदी करणार नाही आणि कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दुसरे पीक निवडण्यास सांगितले असल्याचेही केसीआर म्हणाले.

केंद्रीय मंत्र्यांची मी थेट संबंधित भेट घेतली आणि त्यांना खरेदी केलेला तांदूळ घेण्यास सांगितले. ते म्हणाले की मी निर्णय घेईन आणि सांगेन. पण आजपर्यंत कोणतेही उत्तर मला मिळाले नाही. गेल्या वर्षीपासून आतापर्यंत तेलंगणा राज्यात सुमारे ५ लाख टन धान्य पडून आहे. ते केंद्र विकत घेत नसल्याचेही के चंद्रशेखर राव म्हणाले.

केसीआर भाजप प्रदेशाध्यक्षांवर आक्रमक भूमिका घेत म्हणाले, केंद्र म्हणत आहे की ते धान्य खरेदी करणार नाही आणि राज्यात भाजप म्हणत आहे की ते खरेदी करेल. तुम्ही आमच्याबद्दल उद्धटपणे बोललात, तर आम्ही राज्यातील भाजप नेत्यांच्या जीभ कापून टाकू.

बंदी संजय म्हणाले होते की ते मला तुरुंगात पाठवणार आहेत. त्यांना मी मला स्पर्श करण्याचे आव्हान देतो. भाजपवर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून टीका करताना केसीआर म्हणाले की, आम्ही केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत आहोत. शेती कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही पाठिंबा देऊ. शेतकऱ्यांना वाचवण्याची जबाबदारी आपली आहे. विरोधक राजकारण करुन शेतकर्‍यांच्या भावनांशी खेळत आहेत. तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) शेतकर्‍यांच्या हक्कासाठी केंद्राविरोधात आंदोलन करणार असल्याचे चंद्रशेखर राव म्हणाले.

पेट्रोल आणि डिझेलवरील उपकर मागे घेण्यासही केसीआर यांनी केंद्र सरकारला सांगितले. पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत केंद्र सरकार खोटे बोलत आहे. २०१४ मध्ये कच्च्या तेलाची किंमत १०५ डॉलर होती, ती आता ८३ डॉलरवर आली आहे. परदेशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत असल्याचे भाजप जनतेसोबच खोटे बोलत असल्याचे चंद्रशेखर राव म्हणाले.