बिगबींच्या फॅमिली फोटो पेक्षा मागच्या पेंटिंगची अधिक चर्चा
आपल्या सर्व चाहत्यांना दिवाळीच्या शुभकामना देताना बॉलीवूड शेहेनशाह बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या संपूर्ण परिवाराचा एक फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. त्यात बिगबी यांच्याबरोबर पत्नी जया, मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या, नात आराध्या, कन्या श्वेता, नात नव्या नवेली आणि नातू अगस्त्य दिसत आहेत. मात्र सोशल मिडीयावर या फोटो पेक्षा फोटो मागे दिसणारे एक पेंटिंग अधिक चर्चेत आले आहे.
हे पेंटिंग कितीचे आहे, त्यातून काय प्रतीत केले गेले आहे आणि ते कुणी केले आहे याची जोरदार चर्चा सुरु झाली असून हे पेंटिंग एका बैलाचे आहे. असे सांगितले जात आहे कि या पेंटिंगचा संबंध आर्थिक स्थैर्याशी असून या पेंटिंगची किंमत चार कोटी रुपये आहे.
प्रसिद्ध कलाकार मंजीत बावा यांनी हे पेंटिंग तयार केले असून बावा यांचे २००८ मध्ये निधन झाले आहे. मंजीत, भारतीय पौराणिक कथा, सुफी दर्शन प्रेरित आर्ट वर्कसाठी प्रसिद्ध होते. त्यांची पेंटिंग शक्ती, गती, प्रभुत्व, आशा, समृद्धी यांचे प्रतिनिधित्व करतात. बिग बी यांच्या घरातील बैलाचे पेंटिंग सुद्धा शक्ती, गती, परमलाभ, यश, वृद्धीशील समृद्धीचे प्रतिक आहे. मंजीत बावा देवता, पशु, निसर्ग आणि बासरी यांच्या पेंटिंग साठी जगभर ओळखले जातात. त्यांच्या कलेत मनुष्य. पशु सामंजस्य हा विचार आहे. लंडनच्या प्रसिद्ध सोथबे लिलाव कंपनी कडून बावा यांच्या पेंटिंगची विक्री केली जाते आणि त्यांच्या किमती ३ ते ४ कोटी रुपये असतात असेही समजते.