युट्यूब व्हिडीओमुळे फळफळले या महिलेचे नशीब


अमेरिकेत एका महिलेने युट्यूबवर व्हिडीओ बघून 3.72 कँरेटचा हिरा शोधून काढला आहे. या महिलेचे नाव मिरांडा हॉलिंग्सहेड आहे. या घटनेची माहिती स्टेट पार्कच्या अधिकाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्यांनुसार, महिला आपल्या परिवारासोबत अर्कंसास भागातील पार्कमध्ये फिरायला आली होती. त्या भागात अनेक वर्षांपुर्वी हिरे सापडत असे.

मिरांडाने सांगितले की, ती एका झाडाखाली बसली आणि विचार करू लागली की हिरा कसा शोधायचा. तेव्हा तिने युट्यूबवर काही व्हिडीओ बघितले आणि एका जागी लाकडाने खोदण्यास सुरूवात केली. खोदण्यास सुरूवात केल्यानंतर 10 मिनिटाने तिला पिवळ्या रंगाचा एक चमकणारा तुकडा मिळाला. अधिकाऱ्यांना या तुकड्याबद्दल सांगितल्यावर त्यांना हा हिरा असल्याचे सांगितले. अद्याप या हिऱ्याची किंमत किती असू शकते याची माहिती मिळालेली नाही.

मिरांडाने सांगितले की, मी याआधी या पार्कबद्दल केवळ ऐकले होते. आधी माझा विश्वास नव्हता. मात्र नंतर विचार केला की, प्रयत्न तर करून बघू. मला माहिती नाही की, हिऱ्याची किंमत किती आहे, मात्र मला पहिल्याच प्रयत्नात हिरा मिळाला असल्याने मी आनंदी आहे.

Leave a Comment